नाशिक

श्री टेंबलाई माता मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा, जीर्णोद्धार सोहळा

CD
फोटो : H22385 नाशिक : श्री टेंबलाई माता मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याप्रसंगी उपस्‍थित मान्‍यवर. ---------------- श्री टेंबलाई माता मंदिरात प्राणप्रतिष्ठा, जीर्णोद्धार सोहळा सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २४ : द्वारका येथील श्री टेंबलाई माता (त्र्यंबोली देवी) मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व १२५ वर्षे पुरातन मंदिराच्या जीर्णोद्धाराचा धार्मिक सोहळा पार पडला. भक्तिमय, उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्‍या या कार्यक्रमात भाविक उपस्‍थित होते. तीन दिवसीय धार्मिक महोत्सवात परिसरातील भाविकांनी उपस्थित राहून दर्शन, धार्मिक विधींचा लाभ घेतला. सोहळ्याच्या पहिल्या दिवशी शोभायात्रा व मिरवणूक काढली. पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि जयघोषात निघालेल्या या शोभायात्रेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. डोक्यावर कळस घेऊन आलेल्या महिलांचा सहभाग लक्षणीय होता. दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी गणपती पूजन, पुण्याहवाचन, मंडळ स्थापना, देवता हवन, विविध धार्मिक संस्कार व वैदिक मंत्रोच्चारात पूजन विधी पार पडले. त्यानंतर महंत पंचमुखी हनुमान मंदिराचे व दिगंबर आखाड्याचे कुंभमेळ्याचे मुख्य प्रवक्ते भक्ती चरणदास महाराज यांच्या हस्ते मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा विधिवत झाला. श्रीराम शक्ती पिठाचे सिद्धेश्वरानंद महाराज, श्रीनाथ महाराज, विलास पांगारकर, रामसिंग बावरी आदी उपस्थित होते. धार्मिक कार्यक्रमांच्या समारोपानंतर महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेतला. हा सोहळा हिंदू एकता आंदोलन पक्ष प्रणीत शहीद भगतसिंग क्रांतिदल मंडळ ट्रस्ट, अखिल महाराष्ट्र कातारी शिकलकर समाज संघ व श्री टेंबलाई माता भक्त मंडळ यांच्यामार्फत आयोजित केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara District Bank: सातारा जिल्हा बँक निवडणुकीआधी राजकीय खलबतं; सुनेत्रा पवार-उंडाळकरांची ‘कमरा बंद’ चर्चा चर्चेत

World Athletics U20 Championships: वर्ल्ड अंडर-२० ॲथ्लेटिक्समध्ये भारताचा डंका; आशिष यादवला रौप्य, तर शाहनवाज खानने जिंकले कांस्य पदक!

Shakeel Noorani: ३३ वर्षीय अभिनेत्रीला घरी बोलावून अत्याचार, ७३ वर्षांच्या दिग्दर्शकावर गंभीर आरोप; सिनेसृष्टीत खळबळ

Marathi News Live Updates : पुण्यात सोसायटीत खेळणाऱ्या चिमुकलीला कारने चिरडलं, घटना CCTVत कैद

Nashik Leopard News: बिबट्या पोहोचला शाळेच्या मैदानात, सीसीटीव्हीत कैद; पिंजरा लावण्याची मागणी

SCROLL FOR NEXT