नाशिक

पावसाची दिवसभर रिपरिप

CD
(पावसाचा फोटो येणार आहे) जळगाव : ------------------------------- जळगावसह परिसरात दिवसभर पावसाची रिपरिप ------------ वातावरणात गारवा; शेतकऱ्यांत समाधान, पेरणीच्‍या कामाची लगबग सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २४ : मॉन्‍सूनचे उशिराने आगमन झाले असून, दोन दिवसांपासून जिल्‍ह्यात पाऊस सक्रीय झाल्‍याचे दिसून येत आहे. जळगाव शहरासह परिसरात बुधवारी (ता.२४) सकाळपासून तुरळक पावसाला सुरवात झाली होती. त्यानंतर दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. दरम्‍यान, दोन दिवस जिल्ह्याला वेध शाळेकडून यलो अलर्ट जाहीर केला असून, पावसामुळे शेतकऱ्यांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील अनेक दिवसांपासून पावसाची प्रतिक्षा लागून होती. जून महिना अंतिम टप्‍प्‍यात आल्‍यानंतरही पावसाचे आगमन झाले नव्‍हते. त्यामुळे सर्वांच्‍या नजरा आकाशाकडे लागून होत्‍या. दरम्‍यान, रविवारी (ता.२१) शहरासह काही भागांत तुरळक पाऊस झाला. त्यानंतर सोमवारी (ता.२२) सकाळी पुन्‍हा पावसाला सुरवात झाली. मात्र, दिवसभर ऊन होते. मात्र, बुधवारी सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू होती. तापमानात घट, हवेत गारवा अनेक दिवसांपासून तीव्र उन्‍हाचा तडाखा जळगावकरांना सहन करावा लागत होता. शिवाय हवेत आर्द्रता निर्माण झाल्‍याने उकाड्यातही प्रचंड वाढ झाली होती. मात्र, दोन दिवसांपासून जिल्‍ह्यात पावसाला सुरवात झाली आहे. बुधवारी दिवसभर पावसाच्या रिपरिपमुळे तापमानात घट झाली असून, वातावरण आल्हाददायक बनले आहे. पेरणीसाठी लगबग गेल्या काही आठवड्यांपासून पावसाअभावी पेरणी रखडली होती. शेतमशागतीची कामे पूर्ण करून शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसला होता. अखेर पावसाच्या सरी बरसल्याने जमिनीत ओलावा निर्माण झाला असून, पेरणीसाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे शेतकरी सकाळपासूनच शेतात दाखल होत पेरणीची तयारी करताना दिसत आहेत. दोन दिवस ‘यलो अलर्ट’ हवामान वेधशाळेकडून जळगाव जिल्ह्याला दोन दिवस ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. दोन दिवस जिल्ह्यात विजांच्या कडकडटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: पुण्यात गरवारे महाविद्यालयासमोर तरुणींच्या दोन गटांत तुफान हाणामारी, नेमकं काय घडलं?

MHADA House: म्हाडाचं घर स्वस्तात मिळणार, घरांच्या किंमती होणार कमी, एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

Palghar Crime: प्रियकरासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर ६ जणांचा सामूहिक अत्याचार, निर्जन बंगल्यात नेत कृत्य; तीन जण ताब्यात

Marathi News Live Updates : गरवारे महाविद्यालयासमोर तरुणींच्या दोन गटांत तुंबळ हाणामारी

Annasaheb Patil Mahamandal : अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या एमडींची तडकाफडकी उचलबांगडी; अविनाश रणखांब नवे व्यवस्थापकीय संचालक

SCROLL FOR NEXT