नाशिक

पाळधी येथे ५ हेक्टरमध्ये साकारतेय आकर्षक वनौद्यान नागरिकांसाठी लवकरच खुले होणार

CD
ॲंकर NSK26H22408 जळगाव : पाळधीजवळ वनविभागातर्फे उभारण्यात आलेले वनोद्यानाचे आकर्षक प्रवेशद्वार. --- पाळधीत ५ हेक्टरवर साकारतेय वनोद्यान वन विभागातर्फे बांबू मचाण, सेल्फी पॉइंटसह विविध संकल्पनाद्वारे उभारणी सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २४ : शहरासह परिसरातील नागरिकांना निसर्गाच्या सान्निध्यात विरंगुळा, आरोग्यदायी वातावरण आणि पर्यावरणाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने वन विभागामार्फत पाळधी येथील एकलग्न गार्डन परिसरात सुमारे ५ हेक्टर क्षेत्रात अत्याधुनिक वनोद्यान साकारण्यात येत आहे. विविध नैसर्गिक संकल्पनांवर आधारित हे वनौद्यान लवकरच पूर्णत्वास येणार असून नागरिकांसाठी खुले करण्यात येणार आहे. वनौद्यानात सर्व वयोगटातील नागरिकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. लहान मुलांच्या मनोरंजनासाठी आकर्षक खेळणी व बालक्रीडा विभाग उभारण्यात आला आहे. पर्यटकांना विश्रांती घेण्यासाठी पॅगोडा, निसर्गरम्य छायाचित्रांसाठी सेल्फी पॉइंट, तसेच परिसराच्या सौंदर्यात भर घालणारे बांबू रेलिंग आणि बांबू मचण तयार करण्यात येत आहे. पर्यावरण संवर्धन आणि भारतीय संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी येथे बुद्ध वन, जैन वन, आरोग्य वन, नक्षत्र वन, सप्तऋषी वन आणि राशी वन अशा विविध संकल्पनांवर आधारित विभाग विकसित करण्यात आले आहेत. या विभागांमुळे नागरिकांना विविध वृक्षप्रजातींची माहिती मिळण्यास मदत होणार आहे. तसेच औषधी व आरोग्यदायी वनस्पतींची लागवड करून आरोग्य वनाची निर्मिती करण्यात आली आहे. नॅचरल फिटनेस पार्क रोज गार्डन, थीम गार्डन, हिरवळयुक्त लॉन आणि नैसर्गिक वातावरणात व्यायाम करता यावा, यासाठी नॅचरल फिटनेस पार्क उभारण्यात येत आहे. सकाळी व सायंकाळी फिरण्यासाठी तसेच कुटुंबासमवेत वेळ घालविण्यासाठी हे वनोद्यान आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. चौकट हरित क्षेत्रात होणार वाढ वन विभागाच्या या उपक्रमामुळे परिसरातील हरित क्षेत्रात वाढ होणार असून, पर्यावरण संवर्धनाला चालना मिळणार आहे. काम अंतिम टप्प्यात असून लवकरच हे वनौद्यान नागरिकांसाठी खुले करण्यात येणार असल्याने जळगावकरांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : रेल्वे तिकीट तपासणीला आता बॉडी कॅमेऱ्याची नजर! १५ बॉडी कॅमेरे, ३० खास जॅकेट; एसी लोकलमध्ये विशेष देखरेख

‘गौतम गंभीर चांगला माणूस आहे, पण कोच म्हणून...’; हरभजन सिंगच्या या वक्तव्याने क्रिकेटविश्वात चर्चांना उधाण; नेमकं काय म्हणाला?

Sakal Tourism Expo 2026 : पुणेकरांना मिळणार पर्यटनाची मेजवानी! ‘सकाळ टुरिझम एक्स्पो २०२६’ २१ ते २३ ऑगस्टदरम्यान

Sakal Impact : ३ हजार ५६ विद्यार्थ्यांना दिलासा! कचरावेचकांच्या मुलांच्या शिष्यवृत्तीचा मार्ग अखेर मोकळा; ३० सप्टेंबरपर्यंत खात्यात जमा होणार शिष्यवृत्ती

Koyana Dam Water Release : कोयना धरणातून पाणी सोडण्यात येणार; कृष्णा-कोयना नदीकाठी सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT