नाशिक

संशयित बहिण-भावाने लाटली सेवानिवृत्त अधिकार्यांची जमीन

CD
निवृत्त अधिकाऱ्याची लाटली जमीन बहिण-भावाविरुद्ध गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २४ : निवृत्त शासकीय अधिकाऱ्याच्या कौटुंबिक वादाचा आणि त्याच्या एकटेपणाचा गैरफायदा घेत शेतजमीन लाटल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात बहीण- भावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वंदना जेकब कुर्हाडे, राजू जेकब कुर्हाडे, अशी संशयितांची नावे आहेत. राजेंद्र आढाव यांच्या फिर्यादीनुसार, ते २०१३ मध्ये आनंदवली परिसरात एकटे राहत असताना त्यांची ओळख संशयित वंदनाशी झाली होती. आढाव यांचा कौटुंबिक वाद असल्याने त्यांना चाचडगाव (ता. दिंडोरी) येथे शेतजमीन स्वतःच्या नावावर खरेदी करण्यास कायदेशीर अडचणी होत्या. याचा फायदा घेत वंदनाने सध्या ही जमीन माझ्या नावावर खरेदी करू, नंतर ती तुमच्या नावावर हस्तांतरित करून देईन, असे आश्वासन दिले होते. आढाव यांनीही तिच्या या आश्वासनावर विश्वास ठेवला आणि तिला सप्टेंबर २०१३ मध्ये बँक ऑफ इंडियाच्या खात्यातून ४ लाख रुपये रोख काढून दिले. वंदनाने त्यातील ३ लाख रुपयांच्या डीडीद्वारे ती शेतजमीन स्वतःच्या नावावर खरेदी केली आणि यासाठी ती शेतकरी असल्याचा खोटा पुरावा जोडल्याचा दावाही आढाव यांनी फिर्यादीत केला आहे. शेतजमीन खरेदी झाल्यानंतर आढाव यांनी वाघाड धरणावरून पाइपलाइन आणून तिथे फळबाग केली आणि संजय थेटे नावाच्या शेतकऱ्याला कसण्यासाठी दिली. -- नियत बदलली जमीन विकसित झाल्यानंतर संशयित वंदनाची नियत बदलली. आढाव यांनी जमीन नावावर करून देण्याचा तगादा लावला असता तिने नकार दिला. तसेच, संशयित वंदना व तिचा भाऊ राजू हे आढाव आणि थेटे यांना शेतात जाऊन धमकावू लागले. संशयितांनी ‘तुमच्यावर खोट्या केसेस करू, जेलमध्ये टाकू, समाजात बदनामी करून जिवंत सोडणार नाही’, अशी धमकी देत आढाव यांना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. राजू गुन्हेगारी वृत्तीचा असल्याने आणि धमक्यांमुळे घाबरलेल्या आढाव यांनी पोलिस ठाणे गाठले. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayank Lohar News: मुंबई लोकलमधील हत्याकांडाचा उलगडा! अखेर आरोपीला अटक; वडिलांच्या चौकशीतून मिळाला ठावठिकाणा

ओंकार भोजनेच्या गाजलेल्या स्कीटवर विद्या बालन फिदा; स्वतः बनवला रील, व्हिडिओ पाहून नेटकरी खुश

Latest Marathi News Live Update : यवतमाळ जिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवात

किरकोळ वाद आता चाकूहल्ल्यांपर्यंत... प्रवाशांमध्ये संताप का वाढतोय? मुंबई लोकलमधील वाढत्या आक्रमकतेचे विश्लेषण

Baramati News : बारामतीच्या पाणीपुरवठा प्रकल्पांना गती देण्याचे सुनेत्रा पवार यांचे निर्देश....

SCROLL FOR NEXT