नाशिक

लखनौ दुर्घटनेनंतर नाशिकचे कोचिंग क्लासेस रडारवर

CD
एन्कर ----------- शहरातील २ हजार कोचिंग क्लासेसचे होणार फायर ऑडिट नियमांचे उल्लंघन करणाऱ्या क्लासचालकांना मिळणार थेट नोटीस सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २४ : उत्तर प्रदेशातील लखनौतील कोचिंग क्लासला लागलेल्या आगीत १५ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यानंतर महापालिकेच्या अग्निशमन विभागाने शहरातील खासगी क्लासेसच्या सुरक्षेचा विषय हात घेतला आहे. दोन हजारांहून अधिक कोचिंग क्लासेस असलेल्या नाशिकमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मुख्य अग्निशमन अधिकारी संजय बैरागी यांनी स्पष्ट केले की, आता शहरातील सर्व क्लासेसचे सर्वेक्षण केले जाणार आहे. अग्निप्रतिबंधक यंत्रणा, एक्झिट, अलार्म यांची प्रत्यक्ष तपासणी होणार असून, निकष पूर्ण न करणाऱ्या क्लासचालकांना थेट नोटिसा बजावल्या जाणार आहेत. गुजरातमधील दुर्घटनेनंतर २०२३ मध्येही महापालिकेने सुमारे ४० क्लासेसना नोटिसा पाठवून फायर ऑडिट बंधनकारक केले होते. परंतू बहुतांश क्लास चालकांनी महापालिकेच्या सूचनेकडे दुर्लक्ष केले. आता लखनौ दुर्घटनेच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेचा अग्निशमन विभाग पुन्हा ॲक्शन मोडवर आला आहे. आता क्लासेसच्या जागेचे ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या आहे. यापूर्वी संपूर्ण इमारतीचे ऑडिट बंधनकारक केले होते . आता फक्त क्लासेसच्या जागेचे ऑडिट बंधनकारक करण्यात आल्याने क्लासचालकांवरील आर्थिक भार कमी होणार आहे. कोचिंग क्लासेस संचालक संघटनेचे अध्यक्ष प्रा. जयंत मुळे यांनी महापालिकेच्या भूमिकेचे स्वागत करताना संघटनेच्या सर्व सभासदांना आम्ही आधीच अग्निसुरक्षेच्या उपाययोजना करण्यास सांगितले आहे. पण महापालिकेने संपूर्ण इमारतीचे ऑडिटची अट हटवणे योग्य आहे. क्लासचालक एकट्याने संपूर्ण बिल्डिंगची जबाबदारी घेऊ शकत नाही, असे त्यांनी म्हटले. दरम्यान, नियमनाचा बडगा उगारण्याबरोबरच महापालिकेने अंमलबजावणीत सातत्य ठेवावे, अशी अपेक्षा पालकांकडून व्यक्त होत आहे. --चौकट ‘नियमित तपासणीच खरी सुरक्षा’ विद्यार्थ्यांची संख्या लाखांच्या घरात असताना एकदा नोटीस काढून फाइल बंद करण्यापेक्षा नियमित तपासणीच खरी सुरक्षा देऊ शकेल, अशी प्रतिक्रिया पालक वर्तुळातून येत आहे. महापालिकेच्या नियमानुसार, शहरातील सर्व व्यावसायिक इमारती आणि मोठ्या गृहनिर्माण संस्थांनी वर्षातून दोनदा फायर ऑडिट अहवाल सादर करणे बंधनकारक आहे. आता कोचिंग क्लासेसनाही त्याच कसोटीवर तपासले जाणार आहे. ---------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१३ लाख रुपयांची नोकरी सोडून AI मध्ये मास्टर्स पूर्ण; फोटोग्राफरच्या मुलाला दीड कोटी रुपयांचे पॅकेज कसं मिळालं?

Maratha Reservation: मनोज जरांगेंच्या आंदोलनामागे प्रसाद लाड? लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप; राजकीय वर्तुळात खळबळ

Marathi News Live Updates: कोतवालांच्या पदोन्नतीचा मार्ग बंद; सुधारित आकृतिबंधाचा मोठा फटका

SARFARAZ KHAN COMEBACK: १७ किलो वजन कमी... काश्मीरमध्ये तासन्‌तास सराव; सर्फराझ खानने टीम इंडियात कमबॅकसाठी काय काय केलं?

TMT Bus: दोन किलोमीटरसाठी १० रुपये तर..., ठाणेकरांवर महागाईचं संकट; टीएमटी बसच्या तिकीट दरात वाढ

SCROLL FOR NEXT