नाशिक

कृषी विभागात नोकरीचे आमीष देत गंडा.

CD
सेकंडमेन ----------- कृषी विभागात नोकरीचे आमीष देत गंडा ------ पिता-पुत्राकडून निवृत्त आगार व्यवस्थापकाची साडेतीन लाखांत फसवणूक सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २४ : शहरातील संभाजीनगरमधील सेवानिवृत्त व्यक्तीला गाठून तुमच्या मुलास कृषी विभागात कायम नोकरीवर लावून देतो, असे आमीष दाखवून दहा लाखांची मागणी केली होती. त्यापैकी साडेतीन लाख रुपये आगाऊ घेऊन गंडविल्याचा प्रकार समोर आला. रामानंदनगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. येथील एसटी आगाराच्या व्यवस्थापकपदावरुन सेवानिवृत्त झालेले नामदेव देवराम मोरे (वय ६६) कुटूंबीयांसह शहरातील गोविंदपुरा संभाजीनगरात वास्तव्यास आहेत. त्यांची भारत एकनाथ गायकवाड व साहिल भारत गायकवाड (दोघे. रा. घाटनांद्रा जि. बुलढाणा) यांच्याशी ओळख झाली होती. याच ओळखीचा गैरफायदा घेत या पिता-पुत्राने नामदेव मोरे यांच्या उच्चशिक्षित मुलास कृषी विभागात नोकरीला लावून देतो, असे आमीष दिले होते. सरकारी नोकरी लावून देण्याच्या आमीषाला बळी पडून मोरे यांनी गायकवाड पिता-पुत्राला २३ डिसेंबर २०२२ला तीन लाख रुपये ‘आरटीजीएस’द्वारे, तर ५० हजार रुपये रोखीने दिले होते. पैसे दिल्यानंतरही नोकरी लागत नाही, म्हणून ज्ञानेश्वर मोरे यांनी विचारणा केली. पैशांसाठी तगादा लावल्याने दोघा पिता-पुत्राने धमकविण्यास सुरवात केली. अखेर नामदेव देवराम मोरे यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. संशयित दोन्ही पिता-त्राला दिलेले ५० हजारांची रोकड, भारतीय स्टबेट बँकेचे ‘आरटीजीएस’ची पावती सादर करून तक्रार दिल्याने रामानंदगर पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तपास उपनिरीक्षक संजय शेलार करीत आहेत. मंत्रालयात सचिवांशी मैत्री मुंबईतील मंत्रालयात सचिवांसोबत उठबस असल्याबाबत भूलथापा देऊन मोरे यांच्या मुलास कृषी विभागातर्फे नोकरीसाठी प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींचे कात्रण पाठवून अमूक एक केंद्रातून परीक्षा देण्याच्या सुचना देण्यात आल्या. परीक्षा संपल्यावरही चौकशी लागली आहे, असे भासवून घेतलेले पैसे परत देण्याऐवजी उर्वरीत साडेसहा लाखांसाठी दोघा भामट्यांनी मोरे कुटूंबीयांकडे तगादा लावला होता. भारत गायकवाड याने पैसे देण्यास टाळाटाळ करून बेपत्ता झाल्याने मोरे यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. उर्वरीत साडेसहा लाख रुपये वाचवून दोघा पिता-पुत्राचा भांडाफोड करण्यात यश आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेवटच्या दिवशी PM मोदी आणि शहा आले, ४ मिनिटात कामकाज आटोपले; लोकसभा अनिश्चित काळासाठी तहकूब

Shaktipeeth Highway Protest : जयंत पाटील, राजू शेट्टी एकत्र! 'शक्तिपीठ' रद्द करण्यासाठी सांगलीत मोठ्या आंदोलनाची घोषणा; 31 गावांतील 3 हजार एकरांहून अधिक जमीन बाधित

तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धडाका! डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह बड्या ब्रँड्सवर FDAची धाड; 5 परवाने निलंबित

Independence Day 2026: तिरंगा थीमवर सजवा घर, शाळा अन् ऑफिस! १५ ऑगस्टला नक्की ट्राय करा 'या' भन्नाट डेकोरेशन आयडियाज!

Latest Marathi News Live Update : पावसाळी अधिवेशनादरम्यान सरकारचे अत्यंत अहंकारी वर्तन- कॉंग्रेस

SCROLL FOR NEXT