नाशिक

राज्यातील ४५ हजार सभासद अ वर्गात

CD
मराठी चित्रपट महामंडळातील ४५ हजार सभासदांना मिळणार ‘अ’ वर्गाचा दर्जा उत्तर महाराष्ट्रातील ४३० सभासदांनाही मतदानाचा मार्ग मोकळा सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २४ : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीच्या पहिल्याच बैठकीत राज्यातील सुमारे ४५ हजार ‘ब’ वर्ग सभासदांना ‘अ’ वर्ग सभासदत्व देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे उत्तर महाराष्ट्रासह राज्यभरातील हजारो सभासदांना मतदानाचा अधिकार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महामंडळाच्या घटनेनुसार एखाद्या सभासदाला सलग तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर कार्यकारिणीच्या मंजुरीने ‘अ’ वर्ग सभासदत्व दिले जाते. २९ डिसेंबर २०१८ ला झालेल्या कार्यकारिणी बैठकीत अधिकृत मूळ सभासद नोंदवहीतील क्रमांक २४००९ पर्यंतच्या सभासदांना ‘अ’ वर्गाची मंजुरी देण्यात आल्याची नोंद इतिवृत्तात आहे. मात्र त्यानंतर ‘अ’ वर्ग सभासदत्वासंदर्भात कोणताही ठराव मंजूर न झाल्याने क्रमांक २४००९ नंतरच्या हजारो सभासदांची नावे मतदानपात्र यादीत समाविष्ट झाली नव्हती. या सभासदांनी नियमांनुसार विहित मुदतीत वर्गणी भरलेली असून, त्याची नोंद अधिकृत नोंदवहीत आहे. तरीदेखील अलीकडे झालेल्या महामंडळाच्या निवडणुकीत राज्यभरातील केवळ तीन हजार ४०३ सभासदांनाच मतदानाचा अधिकार मिळाला होता. उर्वरित हजारो सभासद मतदानापासून वंचित राहिले होते. निवडणुकीनंतर झालेल्या नव्या कार्यकारिणीच्या पहिल्याच बैठकीत हा प्रश्न मार्गी लावत ‘ब’ वर्गातील सभासदांना ‘अ’ वर्गात वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला सभासदत्वाचा प्रश्न निकाली निघण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. चौकट निवडणुकीत ५०० पैकी केवळ ७० सभासद पात्र उत्तर महाराष्ट्रात सुमारे ५०० सभासद असतानाही नुकत्याच झालेल्या निवडणुकीत केवळ ७० सभासद मतदानासाठी पात्र ठरले होते. ‘अ’ वर्ग सभासदासाठी पाच हजार रुपये शुल्क असून, त्याला मतदानाचा अधिकार मिळतो. तर ‘ब’ वर्ग सभासदासाठी दोन हजार २०० रुपये शुल्क असून, मतदानाचा अधिकार नसतो. या निर्णयानंतर उत्तर महाराष्ट्रातील सभासदांची सुधारित यादी तयार केली जाणार आहे. ज्यांनी आवश्यक शुल्क भरलेले नाही त्यांना सूचना देण्यात येणार असून, मृत, स्थलांतरित अथवा निष्क्रिय सभासदांची छाननी करून अद्ययावत यादी महामंडळाकडे पाठविण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: ‘तुम्हाला तर स्वातंत्र्य २३ एप्रिल २०१४ ला मिळाली ना?’; कंगनाच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप, व्हिडिओ पाहा...

Mumbai Accident: इस्टर्न फ्रीवेवर मस्ती नडली, एकाचा मृत्यू दोघे गंभीर; दुचाकी अपघाताचा भीषण VIDEO

Maharashtra Companies : 6 लाखांवरून थेट 21 लाखांवर! मोदी सरकारच्या काळात कंपन्यांची संख्या कशी वाढली? उदय सामंतांचा मविआला सवाल, 'फेक नॅरेटिव्ह'वरुनही पलटवार

Marathi News Live Updates : वर्ध्यात भटक्या कुत्र्याचा हैदोस, दिवसभरात तब्बल १९ जणांना चावा

Devbhumi Jat Name Change Latest News : सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! 'देवभूमी जत' नामकरणाचा मार्ग मोकळा, गॅझेट नोटिफिकेशन लवकरच; पालकमंत्री चंद्रकांतदादांची माहिती

SCROLL FOR NEXT