नाशिक

उन्‍हाळी सत्र परीक्षांना प्रश्‍नपत्रिका पाठविणार ऑनलाइन

CD
उन्हाळी परीक्षांसाठी ऑनलाइन प्रश्नपत्रिका व्यवस्था राज्यातील १६७ केंद्रांवर ७८ हजार ९०० विद्यार्थी देणार परीक्षा सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २४ : पेपरफुटी अथवा तत्सम गैरप्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने (एमयूएचएस) दुसऱ्या टप्प्यातील उन्हाळी सत्र परीक्षांसाठी विशेष खबरदारी घेतली आहे. त्यानुसार संबंधित विषयाची प्रश्नपत्रिका परीक्षेच्या दिवशी सकाळीच ऑनलाइन पद्धतीने परीक्षा केंद्रांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. पदवी व पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या या परीक्षा शनिवार (ता. २७) पासून सुरू होत असून, २२ जुलैपर्यंत परीक्षा प्रक्रिया चालणार आहे. राज्यातील १६७ परीक्षा केंद्रांवर या परीक्षा होणार आहेत. पदवी अभ्यासक्रमांमध्ये बीडीएस, बीएएमएस, बीयूएमएस, बीएचएमएस, बीपीटीएच, बीओटीएच, बी.एस्सी. नर्सिंग, पीबीबीएससी, बेसिक बी.एस्सी. नर्सिंग, बीएएसएलपी आणि बीपीओ या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. तर पदव्युत्तर स्तरावर एम.एस्सी. नर्सिंग, एम.डी. होमिओपॅथी, एमपीएच, एमपीएच (एन.), एमबीए, एम.फिल., बी. ऑप्टोमेट्री, डिप्लोमा ऑप्टोमेट्री अँड ऑप्थॅल्मिक, बीपीएमटी, डिप्लोमा पॅरामेडिकल, पीजीडीएमएलटी, सीसीएमपी आणि एम.एस्सी. फार्मास्युटिकल या अभ्यासक्रमांच्या परीक्षा होणार आहेत. ७८ हजारांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला या परीक्षेसाठी विविध अभ्यासक्रमांतील एकूण ७८ हजार ९०० विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. हिवाळी-२०२४ टप्पा चारच्या परीक्षांपासून सुरू करण्यात आलेल्या पद्धतीनुसार प्रश्नपत्रिका ऑनलाइन संगणक प्रणालीद्वारे परीक्षा सुरू होण्यापूर्वी केंद्रांवर पाठविण्यात येतील. तसेच उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग करून त्यांचे ऑनलाइन मूल्यमापनही करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी सकाळच्या सत्रासाठी सकाळी ९ वाजता आणि दुपारच्या सत्रासाठी दुपारी १ वाजता, म्हणजेच परीक्षा सुरू होण्याच्या किमान एक तास आधी केंद्रावर उपस्थित राहावे, असे आवाहन परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पासपोर्ट म्हणजे नागरिकत्वाचा पुरावा नाही; MEA कडून महत्त्वाचे स्पष्टीकरण, २७ देशांत भारतीयांना व्हिसा-फ्री प्रवेशाची घोषणा

IND vs ENG, T20I: एकट्या वैभव सूर्यवंशीसाठी इंग्लंडमध्ये वेगळी ड्रेसिंग रुम असणार! पण नेमकं यामागे खरं कारण काय?

Latest Marathi News Live Update : शेती उपसा सिंचन योजनेसाठी वीज कनेक्शन मिळावे, या मागणीसाठी शेतकऱ्यांचे उपोषण

निळावंतीचं रहस्य आणि गुप्त खजिन्याचा शोध! ब्रिटिशकालीन इतिहासावर आधारित 'इंद्रजाल'चा थरारक फर्स्ट लुक आउट

Solapur Water Rights: दुष्काळी १३ तालुक्यांसाठी ३४ वी पाणी संघर्ष परिषद २६ जूनला मंगळवेढ्यात

SCROLL FOR NEXT