नाशिक

हस्ती बँक

CD
धुळे : टुडे पान ३ साठी..अँकर -- फोटो क्रमांक : 22414 - लोगो -- हस्ती बँकेत ‘आवास योजना २.०’चा शुभारंभ -- सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न होणार साकार; योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २४ : सर्वसामान्य नागरिकांचे स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी दोंडाईचा येथील हस्ती बँक सरसावली आहे. केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.०’ ची अंमलबजावणी बँकेने अधिकृतपणे सुरू केली असून, बँकेच्या सर्व २३ शाखांमधून या योजनेचा लाभ नागरिकांना उपलब्ध करून दिला जाणार आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी हस्ती बँकेने ‘नॅशनल हाऊसिंग बँक’ सोबत विशेष सामंजस्य करार केला आहे. त्यामुळे पात्र नागरिकांना शासनाच्या गृहअनुदानाचा (सबसिडी) लाभ मिळवून देण्यासाठी बँक आता पूर्णपणे सज्ज झाली आहे. ही योजना प्रामुख्याने शहरी भागासाठी लागू असून, नगरपालिका व टाऊन प्लॅनिंग क्षेत्रातील पात्र घरांसाठी शासनाच्या अटींनुसार एक लाख ८० हजार रुपयांपर्यंतची सबसिडी पाच टप्प्यांत वितरित केली जाणार आहे. या योजनेसाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी वार्षिक उत्पन्न तीन लाखांपर्यंत, अल्प उत्पन्न गटासाठी तीन लाख ते सहा लाख आणि मध्यम उत्पन्न गटासाठी सहा लाख ते नऊ लाखांपर्यंत उत्पन्नाची अट आहे. तसेच, घराचे क्षेत्रफळ १२० चौरस मीटरच्या आत असणे आवश्यक असून, गृहकर्जाची रक्कम २५ लाखांपेक्षा जास्त नसावी आणि घराचे एकूण मूल्यांकन किंमत ३५ लाखांपर्यंत असावी, अशी अट या योजनेसाठी लागू आहे. या संधीचा सर्व पात्र ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन बँकेतर्फे करण्यात आले आहे. या योजनेसाठी बँकेचे सीईओ सतीश जैन, बँकिंग तज्ज्ञ प्रकाश कुचेरिया, किशोर चौधरी, नरेंद्र पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत. - कोट प्रधानमंत्री आवास योजना १.० अंतर्गत हस्ती बँकेने २३१ लाभार्थ्यांना चार कोटी ४५ लाखांची सबसिडी यशस्वीरीत्या मिळवून दिली आहे. योजनेच्या अंमलबजावणीचा दांडगा अनुभव बँकेला आहे. आता ‘आवास योजना २.०’ द्वारे अधिकाधिक पात्र कुटुंबांना एक लाख ८० लाखांपर्यंतच्या अनुदानाचा लाभ मिळवून देण्यासाठी बँक कटिबद्ध आहे. सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल. - कैलास जैन, अध्यक्ष, हस्ती बँक, दोंडाईचा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayank Lohar News: मुंबई लोकलमधील हत्याकांडाचा उलगडा! अखेर आरोपीला अटक; वडिलांच्या चौकशीतून मिळाला ठावठिकाणा

ओंकार भोजनेच्या गाजलेल्या स्कीटवर विद्या बालन फिदा; स्वतः बनवला रील, व्हिडिओ पाहून नेटकरी खुश

Latest Marathi News Live Update : यवतमाळ जिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवात

किरकोळ वाद आता चाकूहल्ल्यांपर्यंत... प्रवाशांमध्ये संताप का वाढतोय? मुंबई लोकलमधील वाढत्या आक्रमकतेचे विश्लेषण

Baramati News : बारामतीच्या पाणीपुरवठा प्रकल्पांना गती देण्याचे सुनेत्रा पवार यांचे निर्देश....

SCROLL FOR NEXT