नाशिक

पदवीधर अंशकालीन शासकीय कर्मचाऱ्यांची शुक्रवारी बैठक

CD
पदवीधर अंशकालीन शासकीय कर्मचाऱ्यांची उद्या बैठक नंदुरबार, ता. २४ : निवृत्त झालेले पदवीधर, अंशकालीन शासकीय कर्मचारी जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांत कार्यरत आहेत. अशा कर्मचाऱ्यांची जिल्हा बैठक शुक्रवारी (ता. २६) सकाळी अकराला नंदुरबार येथील पंचायत समिती सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयात सरळ सेवेने शासकीय सेवेत रुजू झालेल्या अंशकालीन शासकीय कर्मचाऱ्यांना २००५ पूर्वी तीन वर्षांची सेवा पूर्वलक्षीप्रमाणे अंतर्भूत करून जुनी पेन्शन योजना लागू करावी. आंध्र प्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर विशेष बाब म्हणून निवृत्तीचे वय ६२ करावे, अशी मागणी राज्य शासनास केली होती; परंतु राज्य शासनाकडून प्रतिसाद न मिळाल्यामुळे पदवीधर अंशकालीन शासकीय कर्मचारी जुनी पेन्शन हक्क समितीचे राज्याध्यक्ष लातीफ पठाण यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यावर २४ एप्रिल २००६ ला न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल देत १२ आठवड्यांत संघटनेच्या मागण्यांवर निर्णय घेण्याचा आदेश राज्य शासनास दिलेला आहे. यासंबंधी मंत्रालयीन स्तरावर सुरू असलेल्या हालचाली व न्यायालयीन निकालाबाबत माहिती देण्यासाठी जिल्हा बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे. जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पदवीधर अंशकालीन शासकीय कार्यरत व निवृत्त कर्मचारी यांनी शुक्रवारी बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन पदवीधर अंशकालीन शासकीय कर्मचारी जुनी पेन्शन हक्क समितीचे जिल्हाध्यक्ष प्रीतम साळवे, जिल्हा कार्याध्यक्ष जयेंद्र अहिरे, सरचिटणीस राजेश मोहिते, प्रसिद्धीप्रमुख प्रदीप गरुड यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT