NSK26H22439
तोरणमाळ : जून महिन्यात तोरणमाळ येथील यशवंत तलावाची जलपातळी प्रथमच ३० टक्क्यांवर आली आहे.
---
तोरणमाळच्या यशवंत तलावाच्या जलपातळीत घट
नंदुरबार, ता. २४ : तोरणमाळ (धडगाव) परिसरात यशवंत तलाव हा पाण्याचा मुख्य स्त्रोत मानला जातो. यंदा यशवंत तलावाच्या जलपातळीत प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर घट झाली असून, सध्या या तलावात जेमतेम ३० टक्के जलसाठा शिल्लक आहे. त्यातही अर्धाअधिक गाळच आहे. साधारणपणे दर वर्षी जून अखेरपर्यंत यशवंत तलाव तुडुंब भरून पाणी सीताखाईकडे वाहू लागते. त्यामुळे सीताखाई पलीकडे राहत असलेल्या नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होते. तथापि पावसाने दडी मारल्याने बिलदरी, सिंदी दिगर, पनालीपाडा, झापी, कुंदीपाडा येथे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असून, खोल दऱ्यांतून थेंबाथेंबाने मिळणारे पाणी गाढवांच्या मदतीने वाहून आणावे लागत आहे. आणखी काही दिवस पाऊस सुरू न झाल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होणे अपरिहार्य आहे.
---
NSK26H22445 - शेवंतीबाई
कोट
माझे वय ६६ वर्षे आहे. यशवंत तलाव इतका आटलेला मी कधीही पाहिलेला नाही. जूनच्या पहिल्याच आठवड्यात कधी- कधी मेअखेरीस हजेरी लावणाऱ्या पावसाने इतकी दडी मारल्याचे मी प्रथमच पाहत आहे. देव करो आणि लवकर पाऊस सुरू होवो.
- शेवंतीबाई पवार,
तोरणमाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.