घाटकोपर दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू, महापौर रितू तावडेंनी झटकले हात; म्हणे, लोक ऐकत नाहीत

Mumbai Ghatkopar Landslide: घाटकोपरमध्ये दरडीचा काही भाग चाळीतल्या घरावर कोसळून भीषण दुर्घटना घडलीय. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातल्या ५ जणांचा मृत्यू झाला असून आणखी काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जातेय.
Ghatkopar Landslide

Mumbai Ghatkopar Landslide: Five Killed in Chawl House Collapse

Esakal

Updated on

Ghatkopar Landslide: घाटकोपरमध्ये दरड कोसळून घडलेल्या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू झालाय. बुधवारी पहाटे ही दरड कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत डोंगरावरील मातीचा काही भाग घरांवर कोसळला. अशोकनगर, टेकडी क्रमांक ३ इथं ही घटना घडल्याची माहिती समोर आलीय. दरम्यान, या घटनेनंतर महापौर रितू तावडे यांनी पाहणी केली. पाहणीनंतर बोलताना त्यांनी हात झटकत नोटीस पाठवूनही लोक ऐकत नसल्याचं म्हटलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com