नाशिक

पहिल्‍याच पावसात शहराचे तळे

CD
मेन पहिल्‍याच पावसात शहराचे तळे चिखल, धुळीने नागरिक त्रस्‍त; अनेक ठिकाणी रस्‍ते खचले सकाह वृत्तसेवा नाशिक, ता. २४ : शहरासह उपनगरी भागांमध्ये रस्‍ते बांधणीची कामे सुरू असून, यामुळे पहिल्‍या पावसातच शहराचे तळे झाले. सर्वत्र चिखल, धुळीचे साम्राज्‍य निर्माण झाल्‍याने नागरिक त्रस्‍त झाले आहेत. अनेक ठिकाणी रस्‍ते खचल्‍याने पावसाचे पाणी साठून असल्‍याची दृश्‍य बुधवारी (ता. २५) बघायला मिळाले. संपूर्ण पावसाळा जाणार कसा? असा प्रश्‍न उपस्‍थित केला जातो आहे. मोठ्या प्रतीक्षेनंतर मंगळवारी (ता. २३) शहरभर पावसाने हजेरी लावल्‍याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र त्‍यापेक्षाही पाऊस अधिक चिंता वाढविणारा ठरला आहे. दिंडोरी रोडवरील भररस्‍त्‍यावर पाणी साचल्‍याने चारचाकी वाहन पाण्यात अडकले होते. भाभानगर, काठे गल्‍ली सिग्‍नल ते मुंबई नाका या दरम्‍यानही चिख्खल झाल्‍याने गाड्या घसरण्याचे प्रमाण वाढले होते. इतर विविध सर्कल, चौकांमध्ये पाणी साचल्‍याचे दृश्‍य बघायला मिळाले. पहिल्‍याच पावसात शहराचे तळे झाल्‍याने, संपूर्ण पावसाळ्यात शहराचे समुद्रात रूपांतर होते की काय? अशी मिश्‍कील टिपणी नागरिकांकडून केली जाते आहे. दरम्‍यान बुधवारी दिवसभर ढगाळ वातावरण असले तरी पावसाने विश्रांती घेतली होती. यामुळे पहिल्‍या पावसात झालेल्‍या चिखलातील धुलीकण हवेत मिसळले होते. यामुळे दुचाकीस्‍वारांना वाहन चालविताना आव्‍हानांचा सामना करावा लागत होता. अनेक ठिकाणी रस्‍ते खचले असल्‍याने अपघाताच्‍या संख्येतही वाढ झाली आहे. -----चौकट बॅरेकेटिंगची मागणी.. खड्डे, काम सुरु असलेल्‍या रस्‍त्‍यांच्‍या ठिकाणी बॅरेकेटिंग करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते आहे. ठेकेदाराला यासंदर्भात सूचना दिले असल्‍याचा दावा महापालिका प्रशासनातर्फे केला जात असला तरी प्रत्‍यक्षात परिस्थिती वेगळीच असल्‍याची वस्‍तुस्‍थिती आहे. -------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पासपोर्ट म्हणजे नागरिकत्वाचा पुरावा नाही; MEA कडून महत्त्वाचे स्पष्टीकरण, २७ देशांत भारतीयांना व्हिसा-फ्री प्रवेशाची घोषणा

IND vs ENG, T20I: एकट्या वैभव सूर्यवंशीसाठी इंग्लंडमध्ये वेगळी ड्रेसिंग रुम असणार! पण नेमकं यामागे खरं कारण काय?

Latest Marathi News Live Update : केडीएमसी महासभेत सभापतींचा अजब फतवा; इलेक्ट्रॉनिक माध्यमांना प्रवेशबंदी

निळावंतीचं रहस्य आणि गुप्त खजिन्याचा शोध! ब्रिटिशकालीन इतिहासावर आधारित 'इंद्रजाल'चा थरारक फर्स्ट लुक आउट

Solapur Water Rights: दुष्काळी १३ तालुक्यांसाठी ३४ वी पाणी संघर्ष परिषद २६ जूनला मंगळवेढ्यात

SCROLL FOR NEXT