नाशिक

तहकूब झालेली स्थायी समितीची सोमवारी सभा

CD
तहकूब झालेली महापालिकेतील स्थायी समितीची सोमवारी सभा --------- मॉन्सूनपूर्व कामे, यंत्रसामग्री देखभालीवर चर्चा सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २४ : विधान परिषदेच्या निवडणुकीची लागलेल्या आचारसंहितेमुळे येथील महापालिकेतील स्थायी समितीची सभा तहकूब करण्यात आली होती. आचारसंहिता संपल्याने आता ही तहकूब सभा येत्या सोमवारी (ता.२९) आयोजित केली आहे. या सभेत विविध प्रशासकीय व विकासकामांशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर निर्णय घेतले जाणार आहेत. महापालिकेच्या सभागृहात सोमवारी सकाळी ११ला समितीचे सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा होईल. सभेच्या प्रारंभी मागील ४ मेस झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीचे इतिवृत्त मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर शहरातील प्रमुख नाले व उपनाल्यांच्या मॉन्सूनपूर्व सफाईसाठी सुमारे ३९.९१ लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्याबाबत प्रशासनाने सादर केलेल्या प्रस्तावावर चर्चा होणार आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर हा विषय महत्त्वाचा मानला जात आहे. शिवाय महापालिकेच्या अग्निशमन विभागातील चार फायर फायटर वाहनांच्या दुरुस्ती व आवश्यक सुट्या भागांच्या खरेदीसाठी करण्यात येणाऱ्या खर्चास मंजुरी देण्याबाबतही विचारविनिमय होणार आहे. आपत्कालीन सेवांची कार्यक्षमता कायम राखण्यासाठी या प्रस्तावांना महत्त्व दिले जात आहे. आरोग्य, पाणीपुरवठा व बांधकाम विभागाकडील विविध यंत्रसामग्री व वाहनांच्या नियोजित सर्व्हिसिंगसाठी आवश्यक निधी मंजूर करण्याचा प्रस्तावही सभेपुढे ठेवण्यात येणार आहे. शासकीय अथवा निमशासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांच्या सेवा करार पद्धतीने विशिष्ट कामांसाठी घेण्याबाबत प्रशासनाने सादर केलेल्या प्रस्तावावरही चर्चा होणार आहे. सभेत लेखापरीक्षण विभागाच्या साप्ताहिक तपासणी अहवालांची माहिती, अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभागाकडील आगीच्या घटनांबाबतचा अहवालही सदस्यांसमोर मांडण्यात येणार आहे. त्यामुळे विकासकामे, आर्थिक बाबी व आपत्कालीन सेवांशी संबंधित अनेक महत्त्वाच्या निर्णयांकडे या बैठकीत लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT