टूडे साठी
--------
नाशिककरांच्या प्रवासाला डिजिटल गती
नाशिक, ता. २४ : नाशिककरांच्या प्रवासाला आता डिजिटल गती मिळणार आहे. सिटीलिंकने प्रवाशांसाठी अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक तिकीट वितरण यंत्रणा म्हणजेच ईटीआयएम सुरू केली आहे. या सुविधेचा शुभारंभ गुरुवारी (ता. २५) महापौर हिमगौरी आडके यांच्या हस्ते होणार असून, आयुक्त मनीषा खत्री आणि उपमहापौर विलास शिंदे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
नव्या यंत्रणेमुळे प्रवाशांना बसमध्ये थेट युपीआय, डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे तिकीट काढता येणार आहे. डिजिटल पद्धतीने तिकीट तत्काळ निघणार असल्याने रांगा आणि सुट्ट्या पैशांवरून होणारे वाद टळणार आहेत. तसेच भाडे, मार्ग, टप्पे आणि सवलतींची माहिती आधीच प्रणालीत फीड असल्याने वाहकांकडून होणाऱ्या चुका कमी होणार आहेत. या बदलाचा फायदा केवळ प्रवाशांनाच नव्हे तर महसूल व्यवस्थापनालाही होणार आहे. प्रत्येक व्यवहाराची अचूक नोंद होणार असल्याने तिकीट तपासणी आणि उत्पन्नाचा हिशेब अधिक पारदर्शक होईल. वाहकांवरील ताण कमी होऊन ते प्रवासी व्यवस्थापन आणि सुरक्षिततेवर अधिक लक्ष केंद्रित करू शकणार आहेत.मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार मुंडे यांच्या मते, ही सुविधा स्मार्ट सिटीच्या दिशेने टाकले महत्त्वाचे पाऊल आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने नाशिककरांना दर्जेदार, सुरक्षित आणि विश्वासार्ह सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेऊन सिटीलिंकचा अधिक वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
----------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.