फोटो : H22450
-------------
गुणवत्तापूर्ण कामासाठी आयुक्त फिल्डवर
नांदूर नाका-जत्रा हॉटेल मार्गाच्या कामाची पाहणी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २४ : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसह शहरातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी सुरू असलेल्या कामांचा वेग महापालिका प्रशासनाने वाढवला आहे. याचाच एक भाग म्हणून आयुक्त मनीषा खत्री यांनी बुधवारी (ता. २४) नांदूर नाका ते जत्रा हॉटेल या घाट परिसराकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या मार्गावरील कामांच्या गुणवत्तेची प्रत्यक्ष पाहणी केली.
पंचवटी विभागांतर्गत विकसित होणारा ५.८७८ किमी लांबीचा हा मार्ग सिंहस्थ काळात भाविकांच्या वाहतुकीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. पाहणीवेळी रस्त्याच्या सब-बेस आणि जीएसबी लेयरची तपासणी करताना काही ठिकाणी साहित्य विखुरल्याचे आढळले. तातडीने दखल घेत आयुक्तांनी संबंधित ठेकेदाराला जेसीबीच्या साहाय्याने ते साहित्य त्वरित हटवण्याचे आणि जीएसबी थर पूर्ण स्वच्छ केल्यानंतरच पुढील डब्ल्यूएम लेयरचे काम सुरू करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. या मार्गावर सध्या चार मोठी युटिलिटी कामे सुरू आहेत. ओएफसी नेटवर्क आणि अमृत योजनेअंतर्गत पाणीपुरवठा वाहिनीचे काम पूर्ण झाले असून, एमएनजीएल गॅस पाइपलाइन आणि स्टॉर्म वॉटर ड्रेनेजचे काम प्रगतिपथावर आहे. पाहणीनंतर आयुक्त खत्री म्हणाल्या, महापालिका प्रत्येक विकासकामात गुणवत्ता आणि दीर्घकालीन टिकाऊपणाला सर्वोच्च प्राधान्य देत आहे. आमचा उद्देश फक्त काम वेळेत पूर्ण करणे नसून, ते दर्जेदार आणि भविष्यात अनेक वर्षे टिकेल अशा पद्धतीने करणे आहे. गुणवत्तेबाबत कोणतीही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. सिंहस्थाच्या तयारीसोबतच भविष्यातील नाशिकसाठी सक्षम आणि शाश्वत पायाभूत सुविधा उभारण्याचे नियोजन सुरू आहे. त्यासाठी शहरातील सर्व प्रकल्पांवर सातत्याने प्रत्यक्ष पाहणी आणि गुणवत्ता नियंत्रण सुरू ठेवण्यात येणार आहे.
--------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.