नाशिक

महापालिकेचे विशेष कार्यपथक सक्रिय

CD
टूडे साठी ------------- पावसाळ्यापूर्वी विशेष कार्यपथक सक्रिय नालेसफाई ते रस्ते दुरुस्तीपर्यंत युद्धपातळीवर काम सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २४ : सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी आणि पावसाळ्याचा धोका लक्षात घेऊन महापालिकेने शहरात विशेष कार्यपथक कार्यान्वित केले आहे. पाणी साचणे, पूरस्थिती, झाडे-फांद्या पडून होणारी दुर्घटना आणि संसर्गजन्य आजारांचा धोका टाळण्यासाठी सर्व विभागांचा समन्वय साधत प्रतिबंधात्मक कामांना गती देण्यात आली आहे. बांधकाम, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, घनकचरा व्यवस्थापन, उद्यान आणि अतिक्रमण विभाग एकत्र येऊन या मोहिमेत सहभागी झाले आहेत. शहरातील नाले, गटारी आणि आरसी पाइपलाइनची साफसफाई, पावसाचे पाणी साचणाऱ्या ठिकाणी निचऱ्याची व्यवस्था, रस्त्यांवरील खड्डे बुजवणे आणि खराब रस्त्यांची दुरुस्ती ही कामे प्राधान्याने हाती घेण्यात आली आहेत. एमएनजीएल, ऑप्टिकल फायबर, दूरसंचार, वीज, पाणीपुरवठा आणि मलनिस्सारणासाठी खोदण्यात आले रस्ते तातडीने पूर्ववत करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. कामांची गती वाढवण्यासाठी जेसीबी, टिप्पर, क्रेनसह आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यात येणार आहे.आयुक्त मनीषा खत्री यांनी स्पष्ट केले की, सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेली विकासकामे आणि पावसाळ्यातील संभाव्य अडचणी लक्षात घेऊन सर्व विभागांनी युद्धपातळीवर समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. “नागरिकांची सुरक्षितता, मूलभूत सेवा आणि कामांची गुणवत्ता यात कोणतीही हलगर्जी सहन केली जाणार नाही. दिलेल्या निर्देशांचे काटेकोर पालन करून कामे निर्धारित वेळेत पूर्ण करावीत,” असे त्यांनी सांगितले.प्रत्येक विभागातील नियुक्त अधिकारी आपल्या प्रभागातील कामकाजासाठी जबाबदार असणार आहेत. समन्वयक अधिकाऱ्यांना दररोज सायंकाळी ६ वाजेपर्यंत दिवसभराच्या कामाचा अहवाल शहर अभियंत्याकडे सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. निर्देशांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाईचा इशाराही प्रशासनाने दिला आहे. --------------------- नियुक्त करण्यात आलेले अधिकारी व संपर्क क्रमांक विभाग नोडल अधिकारी मोबाईल क्रमांक पंचवटी विभाग राहुल जाधव ८०१०४६२८१६ पूर्व हेमंत झुटे ९६८९७५८५९५ पश्चिम चंदन घुगे ८८८८३२४८४९ सातपूर प्रज्ञा त्रिभुवन ९६०७१३०११० सिडको नानासाहेब साळवे ९९२२४११८४७ नाशिक रोड सुनील राजभोज ७७९८६४४४११ ----------------------------------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rishabh Pant: 'भाई, कन्फर्म! मी परत येतोय...' DC सोबतच्या ट्रेडनंतर रिषभचा फोन अक्षर पटेलने आधी उचलाच नव्हता अन् मग...

Government Recruitment: मोठी बातमी! आरोग्य विभागात लवकरच पदभरती; पदनिर्मितीचा जीआर निघाला, राज्यात एवढ्या जागा रिक्त

Pune City Yellow Alert : पुणे शहराला ‘यलो’ तर घाटमाथ्याला ‘ऑरेंज’ अलर्ट; पुढील तीन दिवसात पावसाचा जोर वाढणार

Latest Marathi News Live Update: कोंढवे धावडे परिसरात मुसळधार पावसाने महापालिकेच्या व्यवस्थापनातील त्रुटी उघड

पासपोर्ट म्हणजे नागरिकत्वाचा पुरावा नाही; MEA कडून महत्त्वाचे स्पष्टीकरण, २७ देशांत भारतीयांना व्हिसा-फ्री प्रवेशाची घोषणा

SCROLL FOR NEXT