राज्यात प्रत्येक पोलिस ठाण्यात
अंधश्रद्धा निर्मूलन कक्षाची मागणी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २४ : दैवी अवताराचा आव आणून महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी भोंदू अशोक खरातच्या अटकेनंतर राज्यभरात आतापर्यंत ५५ भोंदूबाबांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) गेल्या तीन महिन्यांत नाशिक शहर व जिल्ह्यातील पाच भोंदूबाबांचा भांडाफोड करत भोंदूगिरीविरोधात धडक मोहीम राबविली आहे.
महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन कायद्यातील तरतुदीनुसार प्रत्येक पोलीस ठाण्यात दक्षता अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, तसेच सर्व धर्मांच्या धार्मिक स्थळांवर भोंदूगिरी व बुवाबाजी रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवून कायदेशीर नोटिसा बजावाव्यात, अशी मागणी अंनिसने केली आहे. या मागण्यांचे निवेदन अंनिसच्या वतीने अपर पोलिस अधीक्षक विमला एम. यांना देण्यात आले. विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करण्याचे निर्देश तातडीने देण्यात यावेत, अशीही मागणी करण्यात आली. निवेदनावर अंनिसचे राज्य प्रधान सचिव डॉ. टी. आर. गोराणे, राज्य सदस्य कृष्णा चांदगुडे, समर्थ केदारे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.