नाशिक

अवतीभवती

CD
अवतीभवती- धुळे टुडे २ साठी... --- फोटो- NSK26H22452 धुळे : ऑलिम्पिक डेनिमित्त आयोजित स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंसह प्रशिक्षक डॉ. शरतान चौधरी. व्हिजन अकॅडमीमध्ये ऑलम्पिक डे साजरा धुळे : व्हिजन बॅडमिंटन अकॅडमी, जिल्हा क्रीडा संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने ऑलिंपिक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त व्हिजन बॅडमिंटन अकॅडमीतर्फे आयोजित इंटरअकॅडमी बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा १४ व १७ वर्षाआतील मुले व मुली एकेरी या वयोगटासाठी झाली. या स्पर्धेत जिल्हा बॅडमिंटन प्रशिक्षण केंद्रातील एकूण ५० खेळाडूंनी सहभाग नोंदविला. स्पर्धेतील सर्व विजेत्या खेळाडूंना ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत १४ वर्षाआतील मुले व मुली एकेरी वयोगटात मनस्वी पाटील हिने विजेतेपद प्राप्त केले. तर अवनीश पाटील याला उपविजेतेपद मिळाले. १७ वर्षाआतील मुले व मुली एकेरी वयोगटात पार्थ सावंत याने विजेतेपद, तर आर्यन कढरे याने उपविजेतेपद प्राप्त केले. या खेळाडूंना एनआयएस प्रशिक्षक प्रा. डॉ. शरतान चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले. --- फोटो-NSK26H22454 धुळे : प्रशिक्षण वर्गात सहभागी घरेलू कामगार महिला. घरेलू कामगार महिलांसाठी संघटन बांधणी प्रशिक्षण धुळे : नवनिर्मिती घरेलू कामगार संघटनेतर्फे शहरातील साक्रीरोड परिसरातील समता नगर येथे घरेलू कामगार महिलांसाठी संघटन बांधणी प्रशिक्षण झाले. महिलांचे संघटन बळकट करणे, नेतृत्व गुणांचा विकास करणे आणि हक्कांसाठी एकजुटीने लढण्याची प्रेरणा देणे हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश होता. या प्रशिक्षणात प्रशिक्षक जयश्री वाघ व नलिनी बडगुजर यांनी मार्गदर्शन केले. संघटित महिला हीच समाज परिवर्तनाची खरी ताकद असल्याचे श्रीमती वाघ यांनी सांगितले. तर श्रीमती बडगुजर यांनी महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करत नेतृत्व विकासाचे महत्त्व अधोरेखित केले. प्रशिक्षणादरम्यान उपस्थित महिलांनी विविध प्रश्न मांडून चर्चा केली व संघटनेच्या माध्यमातून आपल्या हक्कांसाठी संघटितपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नवनिर्मिती घरेलू कामगार संघटनेचे अध्यक्ष शहाजी शिंदे, शोभा लोंढे, सविता खेडवणकर, दीपिका घोरपडे, वैशाली देवरे, प्रमिला ठाकूर, वंदना मोरे, राखी वाघ, निर्मला सैंदाणे, अश्‍विनी चव्हाण, उषा भालेराव, बेबीकोर शिकलकर, दीपाली मोढे, प्रदीप राठोड आदींनी परिश्रम घेतले. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rishabh Pant: 'भाई, कन्फर्म! मी परत येतोय...' DC सोबतच्या ट्रेडनंतर रिषभचा फोन अक्षर पटेलने आधी उचलाच नव्हता अन् मग...

Government Recruitment: मोठी बातमी! आरोग्य विभागात लवकरच पदभरती; पदनिर्मितीचा जीआर निघाला, राज्यात एवढ्या जागा रिक्त

Pune City Yellow Alert : पुणे शहराला ‘यलो’ तर घाटमाथ्याला ‘ऑरेंज’ अलर्ट; पुढील तीन दिवसात पावसाचा जोर वाढणार

Latest Marathi News Live Update : शेती उपसा सिंचन योजनेसाठी वीज कनेक्शन मिळावे, या मागणीसाठी शेतकऱ्यांचे उपोषण

पासपोर्ट म्हणजे नागरिकत्वाचा पुरावा नाही; MEA कडून महत्त्वाचे स्पष्टीकरण, २७ देशांत भारतीयांना व्हिसा-फ्री प्रवेशाची घोषणा

SCROLL FOR NEXT