धुळे टुडे २ साठी...
---
फोटो-NSK26H22457
धुळे : श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना क्षयरोग निर्मूलनाबाबत मार्गदर्शन करतांना डॉ. राहुल लोखंडे. सोबत इतर मान्यवर.
---
क्षयरोग निर्मूलनासाठी
वैद्यकीय प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २४ : महापालिकेच्या शहर क्षयरोग विभागातर्फे श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थी वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम (NTEP) विषयक प्रशिक्षण झाले.
या प्रशिक्षण कार्यक्रमात छातीरोग विभागाचे प्रमुख डॉ. राहुल लोखंडे तसेच शहर क्षयरोग अधिकारी डॉ. जे. सी. पाटील यांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. प्रशिक्षणास वैद्यकीय अधिकारी डॉ. जुनेद सिद्दिकी, डीपीएस श्री. शशिकांत कुवर, एसटीएस श्री. मनोज सूर्यवंशी तसेच ४२ एमबीबीएस प्रशिक्षणार्थी (इंटर्न्स) उपस्थित होते. प्रशिक्षणामध्ये प्रिझम्प्टिव्ह टीबी रुग्णांची ओळख, क्षयरोगाचे निदान, टीबी नोटिफिकेशन, टीबी उपचार पद्धती, टीपीटी (Tuberculosis Preventive Treatment), सी-टीबी टेस्टिंग तसेच क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमामध्ये वैद्यकीय महाविद्यालयांची भूमिका आणि सहभाग याविषयी माहिती देण्यात आली. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी नवोदित वैद्यकीय अधिकाऱ्यांना अद्ययावत माहिती व प्रशिक्षण देणे आवश्यक असून, या प्रशिक्षणामुळे क्षयरोग निदान, उपचार व रुग्ण व्यवस्थापनाबाबत त्यांचे ज्ञान अधिक सक्षम होणार असल्याचे प्रशिक्षकांनी या वेळी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.