नाशिक

निदा खानच्या जामीनावर आज सुनावणी

CD
संशयितांच्या जामीनावर आज सुनावणी निदा खानच्या वैद्यकीय अहवालाकडे लक्ष सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २४ : टीसीएस कंपनीतील महिलेचे कथित लैंगिक शोषण व धर्मांतराचा प्रयत्न केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील मुख्य संशयित निदा खान, दानिश शेख आणि तौसिफ अत्तार यांच्या जामीन अर्जावर गुरुवारी (ता. २५) सुनावणी होणार आहे. दरम्यान, या प्रकरणातील अन्य संशयितांनीही नाशिक जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केले आहेत. देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार, पीडित महिलेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिचे लैंगिक शोषण करण्यात आले तसेच धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा आरोप आहे. या प्रकरणात निदा खान, दानिश शेख व तौसिफ अत्तार यांच्याविरोधात लैंगिक शोषण, धर्मांतराचा प्रयत्न आदी विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिन्ही संशयित सध्या नाशिक रोड येथील मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. यापूर्वी त्यांचे जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळले होते. दरम्यान, निदा खान गर्भवती असून कारागृहातील वास्तव्यामुळे तिच्या प्रकृतीवर परिणाम होत असल्याचा युक्तिवाद तिच्या वकिलांनी अतिरिक्त सत्र न्यायालयात केला होता. त्यानंतर न्यायालयाने वैद्यकीय तपासणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार संबंधित वैद्यकीय अहवाल गुरुवारी न्यायालयात सादर होण्याची शक्यता आहे. या अहवालाच्या आधारे निदा खानच्या जामीन अर्जाबाबत निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच दानिश शेख, तौसिफ अत्तार आणि या गुन्ह्यातील अन्य आठ संशयितांच्या जामीन अर्जांवरही नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी अपेक्षित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Electricity: येत्या दोन वर्षांत गुजरातपेक्षाही स्वस्त वीज: मुख्यमंत्री फडणवीस, २०२९-३० पर्यंत महाराष्ट्र अव्वल ठरणार

FIFA World Cup: पुढचा प्रश्न घ्या... रोनाल्डोची मेस्सी, एम्बापेशी तुलना करणाऱ्या प्रश्नावर चिडचिड

Ketan Agrawal Murder Case : सिया लग्न मोडून प्रियकरासोबत पळून का गेली नाही? चेतनने पोलीस तपासात सांगितले धक्कादायक सत्य

२ वर्षांच्या चिमुकल्याला २५ वेळा चावा, २० मिनिटं मारहाण, एकाने केल्या उलट्या; प्ले स्कूलमधील संतापजनक प्रकार

Latest Marathi News Live Update : संजय राऊत यांनी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांना लिहिले पत्र

SCROLL FOR NEXT