नाशिक

धुळे टुडे १ संक्षीप्त

CD
धुळे ः टुडे १ साठी, संक्षीप्त -- कोयत्याने हल्ला; दोनजण जखमी धुळे : शहरातील गफूरनगर भागात एका तरुणाला आणि त्याच्या साथीदाराला बेदम मारहाण झाली. तसेच कोयता आणि लोखंडी रॉडने हल्ला करून दोघांना गंभीर जखमी केल्याची घटना घडली. याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला. सद्दाम ऊर्फ बबलू हानीफ अन्सारी (वय ३३, रा. रामदेवबाबानगर, धुळे, ह. मु. गफूरनगर, नाल्याजवळ) याच्या फिर्यादीनुसार २१ जूनला रात्री नऊच्या सुमारास गफूरनगर भागातील नाल्याजवळ हा हल्ला झाला. सद्दाम आणि त्याचा साथीदार रस्त्यावरून जात असताना साहिल फिरोज सिकलीकर, मुनीर सिकलीकर, भुरी मुनीर सिकलीकर, साद ऊर्फ गोलू फिरोज सिकलीकर, निलोफर मुनीर सिकलीकर (सर्व रा. गफूरनगर, नाल्याजवळ, धुळे) यांनी लोखंडी रॉड आणि कोयत्या घेत दोघांना गाठले. दमदाटी करीत लोखंडी रॉड आणि कोयत्याने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. - महिलेला मारहाण; सात जणांवर गुन्हा धुळे : भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या महिलेला सात जणांनी मारहाण केल्याची घटना १९ जूनला सायंकाळी घडली. याप्रकरणी निजामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याबाबत सरलाबाई परशराम देसाई (वय ४५, रा. वरसूस, ता. साक्री) यांच्या फिर्यादीनुसार त्यांचा मुलगा व भाच्याला गावातील सातजण मारहाण करीत होते. त्यांना सोडविण्यासाठी गेल्या असता पिट्ट्या काशिनाथ सोनवणे, राहुल पिट्ट्या सोनवणे, अमर सोनवणे, संतोष रामभाऊ सोनवणे, राजू दामू ठाकरे, वेनूबाई काशिनाथ सोनवणे, चंद्राबाई पिट्ट्या सोनवणे यांनी मारहाण केली. - अवैध गोवंश वाहतूक; दोघांविरुद्ध गुन्हा धुळे : कत्तलीच्या उद्देशाने विनापरवाना बैलाची वाहतूक करणार्‍या वाहनावर दोंडाईचा (ता. शिंदखेडा) पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत २० हजार रुपये किमतीचा बैल आणि पाच लाखांचे वाहन, असा एकूण पाच लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई २२ जूनला सकाळी पावणेआठच्या सुमारास जुना शहादा रोडवरील रेल्वे गेटजवळील कसाईवाडा परिसरात केली. याबाबत चुडामण बोरसे (रा. हुडको कॉलनी, दोंडाईचा) यांच्या फिर्यादीवरून संशयित परबतसिंग कोमलसिंग गिरासे (वय ३२) आणि कैलास मंगलसिंग गिरासे (वय ४२, दोघे रा. तावखेडा, ता. शिंदखेडा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. - महिलेला मारहाण; संशयितांविरुद्ध गुन्हा धुळे : बेटावद (ता. शिंदखेडा) येथील एका महिलेच्या घरी येऊन शिवीगाळ करत वाद घालणे, विवस्त्र करण्याचा प्रयत्न करणे तसेच मारहाण केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध नरडाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ही घटना १९ जूनला सकाळी घडली. भूषण तायडे, (रा. बेटावद) व धीरज पांढरे (रा. शिंदखेडा) व अन्य एका महिलेने फिर्यादी महिलेच्या घरी येत शिवीगाळ केली. भांडण सोडविण्यासाठी आलेल्या पीडितेच्या पती व जेठ यांनाही मारहाण करून दुखापत केली. तसेच ठार मारण्याची धमकी दिली. मारहाणीत पीडितेच्या पतीच्या डोक्याला दुखापत झाल्याने त्यास जिल्हा रुग्णालयात उपचारास नेण्यात आले. पीडित महिलेच्या फिर्यादीनुसार संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. - अल्पवयीन मुलींचे बोरीस येथे अपहरण धुळे : बोरीस (ता. धुळे) येथून दोन चुलत अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याची घटना घडली. बारा जूनला दुपारी साडेबाराच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवून दोघींना पळवून नेले. एका मुलीच्या आईच्या फिर्यादीनुसार सोनगीर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल झाला. -

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rishabh Pant: 'भाई, कन्फर्म! मी परत येतोय...' DC सोबतच्या ट्रेडनंतर रिषभचा फोन अक्षर पटेलने आधी उचलाच नव्हता अन् मग...

Government Recruitment: मोठी बातमी! आरोग्य विभागात लवकरच पदभरती; पदनिर्मितीचा जीआर निघाला, राज्यात एवढ्या जागा रिक्त

Pune City Yellow Alert : पुणे शहराला ‘यलो’ तर घाटमाथ्याला ‘ऑरेंज’ अलर्ट; पुढील तीन दिवसात पावसाचा जोर वाढणार

Latest Marathi News Live Update: कोंढवे धावडे परिसरात मुसळधार पावसाने महापालिकेच्या व्यवस्थापनातील त्रुटी उघड

पासपोर्ट म्हणजे नागरिकत्वाचा पुरावा नाही; MEA कडून महत्त्वाचे स्पष्टीकरण, २७ देशांत भारतीयांना व्हिसा-फ्री प्रवेशाची घोषणा

SCROLL FOR NEXT