नाशिक

कत्तलखान्यातून १० गोवंशाची सुटका

CD
फोटो : H22459 नाशिक : आडगाव शिवारात कत्तलखान्यावर करण्यात आलेल्या कारवाईप्रसंगी शहर गुन्हे शाखा युनिट एकचे पथक. कत्तलखान्यातून १० गोवंशांची सुटका --- शहर गुन्हे शाखेची कारवाई : विधीसंघर्षित बालकासह एकाला अटक सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २४ : कत्तलीच्या उद्देशाने गोठ्यात डांबलेल्या १० गोवंशांची सुटका करण्यात शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकला यश आले. या प्रकरणी एका संशयितासह विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले असून, एक लाख ९० हजार रुपये किमतीचे गोवंश जप्त केले आहे. अंमलदार विशाल काठे, अमोल कोष्टी यांना कमलवाडी, निमसे मळा परिसरातील गोठ्यात कत्तलीसाठी गोवंशीय जनावरे डांबून ठेवल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, विशाल काठे, प्रदीप म्हसदे, विशाल देवरे, मिलिंदसिंग परदेशी, संदीप भांड, अमोल कोष्टी, मुक्तार शेख व समाधान पवार यांच्या पथकाने बुधवारी (ता. २४) पहाटे कमलवाडीतील संशयित गोठ्यावर छापा टाकला. या वेळी गोठ्यात १० गोवंश बांधून ठेवल्याचे आढळून आले. पोलिसांनी जागेवरच संशयित काल्या ऊर्फ इर्शाद अब्दुल रेहमान कुरेशी (वय ३८, रा. सावरकर गार्डन, दिंडोरी रोड, नाशिक) यास अटक केली. संशयित कुरेशी याने ही जनावरे नाझीम शेख आणि एका अल्पवयीन मुलाकडून घेतल्याचे कबूल केले. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करीत नांदूर नाका परिसरातून एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले. ही जनावरे कत्तलीसाठी संगमनेर येथे नेण्यात येणार असल्याचे चौकशीतून समोर आले. पोलिसांनी सुटका केलेल्या एक लाख ९० हजार रुपये किमतीच्या सर्व १० गोवंशांना तत्काळ तपोवन येथील कृषी गोसेवा ट्रस्टच्या स्वाधीन केले. या प्रकरणी संशयितांविरोधात आडगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT