नाशिक

मुक्ताईनगर तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस

CD
NSK26H22463 ​कर्की (ता. मुक्ताईनगर) ः नाल्यावरून पाणी वाहिल्याने त्यात अडकलेली खासगी बस. --- मुक्ताईनगर तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस --- भिंत पडून शेतमजुराचा मृत्यू ; नाल्याच्या पुरात बस अडकली सकाळ वृत्तसेवा ​मुक्ताईनगर, ता. २४ ः तालुक्यातील अंतुर्ली, कर्की परिसरात बुधवारी (ता. २४) झालेल्या पहिल्याच पावसाने रौद्ररूप धारण केले होते. या भागात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने परिसरातील नदी, नाल्यांना पूर आला होता. यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळित झाले. कर्की येथील नाल्याला आलेल्या पुरात साखरपुड्याची बस अडकल्याची थरारक घटना घडली. सुदैवाने चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, आरटीओ बॅरेलजवळील भिंत कोसळल्याने शेतमजुराचा मृत्यू झाला, तर एक गंभीर जखमी झाला. सुनील रामराव पाटील (वय ४५, रा. भोटा) असे मृत शेतमजुराचे नाव आहे. ​पहिल्याच मुसळधार पावसामुळे अंतुर्ली आणि कर्की परिसरातील सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. अनेक नागरिकांच्या घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने अन्नधान्य, कपडे आणि संसारोपयोगी वस्तूंचे प्रचंड नुकसान झाले. मुख्य बाजारपेठेतील काही दुकानांमध्येही पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान झाले. ​पावसाने पहिल्याच फटक्यात संपूर्ण परिसराला झोडपल्याने शेतकरी, व्यापारी आणि सामान्यांचे प्रचंड हाल झाले. दुर्घटना टळली ​कर्की (ता. मुक्ताईनगर) येथे साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी पाहुण्यांना घेऊन आलेली खासगी बस गावाजवळील नाल्यावरून जात होती. त्याचवेळी अचानक पाण्याचा प्रवाह वाढला. पाहता पाहता नाल्यावरून पाणी वाहू लागल्याने बस पुराच्या पाण्यात अडकली. पाण्यात अडकल्याचे पाहून प्रवाशांमध्ये खळबळ उडाली. प्रवाशांच्या जीवात जीव नव्हता. मात्र, बसचालकाने कमालीची तत्परता आणि धैर्याने परिस्थिती हाताळत प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. बसमधील सर्व प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला. भरपाईची मागणी दरम्यान, पावसामुळे नुकसान झालेल्या भागात प्रशासनाने तत्काळ पाहणी करून नुकसानीचे पंचनामे करावेत. गोरगरिबांसह नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांनाही त्काळ शासकीय मदत द्यावी, अशी आग्रही मागणी अंतुर्ली व कर्की येथील ग्रामस्थांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

१९ चौकार, ६ षटकार... Vaibhav Sooryavanshi चा भाऊही घालतोय धुमाकूळ! दीडशतक ठोकल्यानंतर भावाची स्पेशल पोस्ट

Mumbai AC Local : खुशखबर! 'मरे'वर आणखी १२ एसी लोकल फेऱ्या; एकूण संख्या १२० वर

SCROLL FOR NEXT