नाशिक

वस्तीगृहातील मुलींना जीवे मारण्याचा कट रचल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

CD
वसतिगृह प्रकरणी तीन जणांवर गुन्हा नंदुरबार : वसतिगृहातील महिला सुरक्षारक्षक व महिला सफाई कर्मचारी यांच्याप्रति असलेल्या द्वेषाप्रति वसतिगृहातील मुलींना ठार मारण्याचा कट रचल्याप्रकरणी नंदुरबार शहर पोलिसांत तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदुरबार शहरानजीक असलेल्या होळतर्फे हवेली शिवारातील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृहातील २१ वर्षीय विद्यार्थिनीने याबाबत नंदुरबार शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे. वसतिगृहातील महिला सुरक्षारक्षक व महिला सफाई कर्मचारी यांच्याप्रति असलेल्या द्वेषाप्रति वसतिगृहाच्या पाण्यात व केकमध्ये विष टाकून द्या, असे बोलून ते कृत्य करण्याबाबत जया जरे यांना उकसविण्याचा प्रयत्न करून वसतिगृहातील मुलींना ठार मारण्याचा कट रचण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी कुंदनमाला गणपत पावरा (रा. नंदुरबार), मुन्नी वावे, नीलम परदेशी (पूर्ण नाव नाही) या तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक विश्‍वास भान्सी तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Electricity: येत्या दोन वर्षांत गुजरातपेक्षाही स्वस्त वीज: मुख्यमंत्री फडणवीस, २०२९-३० पर्यंत महाराष्ट्र अव्वल ठरणार

FIFA World Cup: पुढचा प्रश्न घ्या... रोनाल्डोची मेस्सी, एम्बापेशी तुलना करणाऱ्या प्रश्नावर चिडचिड

Ketan Agrawal Murder Case : सिया लग्न मोडून प्रियकरासोबत पळून का गेली नाही? चेतनने पोलीस तपासात सांगितले धक्कादायक सत्य

२ वर्षांच्या चिमुकल्याला २५ वेळा चावा, २० मिनिटं मारहाण, एकाने केल्या उलट्या; प्ले स्कूलमधील संतापजनक प्रकार

Latest Marathi News Live Update : संजय राऊत यांनी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांना लिहिले पत्र

SCROLL FOR NEXT