नाशिक

त्रासातून शेतकऱ्यांची सुटका

CD
धुळे ः टुडे १ साठी, ॲंकर -- गरजेनुसार लोगो छायाचित्र ः 22464 -- ई-पीक पाहणीच्या त्रासातून शेतकऱ्यांची सुटका! - पंधरा जुलैपासून नियुक्त सहाय्यकांमार्फत होणार नोंदणी; शासनाचा निर्णय सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २४ : खरीप हंगामातील पिकांची सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी शेतकऱ्यांना आता स्वतः ई- पीक पाहणी करण्यासाठी धावपळ करावी लागणार नाही. मागील काही वर्षांतील तांत्रिक अडचणी आणि शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद लक्षात घेऊन राज्य शासनाने यंदापासून ही जबाबदारी नियुक्त सहाय्यकांकडे सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी १५ जुलैपासून ही मोहीम राज्यासह जिल्ह्यात सुरू होणार असल्याची माहिती येथील कृषी यंत्रणेने दिली. - राज्य शासनाने २०२२ पासून मोबाईल अ‍ॅपद्वारे ई- पीक पाहणीची अंमलबजावणी सुरू केली होती. मात्र, ग्रामीण भागातील इंटरनेटची समस्या, अनेक शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल नसणे आणि अ‍ॅपमधील तांत्रिक त्रुटींमुळे या प्रक्रियेला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता. यामुळे अनेक शेतकरी पीक नोंदीपासून वंचित राहिले होते. या पार्श्वभूमीवर शासनाने यंदाच्या खरीप हंगामापासून पीक पाहणी पूर्णपणे सरकारी देखरेखीखाली करण्याचा निर्णय घेतला आहे. - महत्त्वाचा निर्णय या मोहिमेसाठी नियुक्त सहाय्यकांसोबतच स्थानिक महिला बचत गटांतील सदस्यांचीही मदत घेतली जाणार आहे. यापूर्वी पिकाची नोंदणी करताना लागवड क्षेत्राच्या ५० मीटर अंतरात उभे राहून छायाचित्र घेण्याची अट होती. आता प्रत्यक्ष पिकाच्या २० मीटर अंतरात जाऊन अचूक नोंदणी करावी लागणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया केंद्र शासनाच्या अ‍ॅग्रीस्टॅक योजनेशी जोडण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांनी यात नोंदणी करून शेतकरी ओळख क्रमांक मिळवला आहे, त्यांना प्रत्यक्ष पाहणीपूर्वी मोबाईलवर संदेश (एसएमएस) पाठविला जाईल. पंधरा जुलैपासून ‘एमएच-डीसीएस अ‍ॅप’च्या माध्यमातून पीक पाहणीची नोंदणी सुरू होईल. यंदा शेतकऱ्यांना स्वतः नोंदणी करण्याची आवश्यकता नसून संपूर्ण प्रक्रिया नियुक्त सहाय्यकांमार्फत पार पडणार असल्याचे भूमी अभिलेख यंत्रणेनेही सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lohagad Murder Case: ''प्रतिष्ठेसाठी सियाने केतनला ठार मारण्याचा प्लॅन केला'', पोलिस चौकशीत चेतनचा धक्कादायक दावा

Rishabh Pant: 'भाई, कन्फर्म! मी परत येतोय...' DC सोबतच्या ट्रेडनंतर रिषभचा फोन अक्षर पटेलने आधी उचलाच नव्हता अन् मग...

Government Recruitment: मोठी बातमी! आरोग्य विभागात लवकरच पदभरती; पदनिर्मितीचा जीआर निघाला, राज्यात एवढ्या जागा रिक्त

Pune City Yellow Alert : पुणे शहराला ‘यलो’ तर घाटमाथ्याला ‘ऑरेंज’ अलर्ट; पुढील तीन दिवसात पावसाचा जोर वाढणार

Latest Marathi News Live Update: नसरापूर अत्याचार प्रकरणाचा उद्या निकाल

SCROLL FOR NEXT