महिला वाहतूक पोलिसाशी
वकीलाने घातली हुज्जत
नाशिक, ता. २४ : जिल्हा सत्र न्यायालयाच्या प्रवेशद्वारासमोर वाहतूक नियमन करणाऱ्या महिला हवालदाराशी हुज्जत घालून त्यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी एका वकिलाविरुद्ध सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रमिला अहिरे (वय ४५) यांच्या फिर्यादीनुसार मंगळवारी (ता.२४) नाशिक वर्क्स युनियनच्या मोर्चामुळे सीबीएस-अशोकस्तंभ मार्गावरील वाहतूक विस्कळित झाली होती. त्यावेळी संबंधित वकिलाने कार अडविल्याचा राग व्यक्त करत वाद घातला. पोलिसांनी थांबण्याची विनंती करूनही त्याने दमदाटी केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.