नाशिक

प्रतिबंधात्मक आदेश लागू

CD
धुळे ः टुडे १ साठी.... आॅरेंज अलर्ट बातमीच्या शेजारी -- धुळे जिल्ह्यात १४ जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २४ : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आगामी काळात विशेष खबरदारी घेतली जात आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात ३० जून ते १४ जुलै २०२६ या कालावधीत मुंबई पोलिस कायदा कलम ३७ (१) (३) अन्वये प्रतिबंधात्मक मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. अपर जिल्हादंडाधिकारी शरद पवार यांनी आज याबाबत अधिकृत आदेश जारी केला. हा आदेश ३० जूनच्या मध्यरात्रीपासून १४ जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत जिल्ह्यात लागू राहणार आहे. आदेशानुसार जिल्ह्यात पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यास (जमावास) किंवा कोणत्याही मिरवणुकीस कायदेशीर बंदी असेल. कोणत्याही स्वरूपाच्या सभा, मोर्चे, रॅली किंवा जाहीर बैठकांवर निर्बंध असतील. या कालावधीत आवश्यक कार्यक्रमांच्या परवानगीबाबत स्थानिक पोलिस ठाण्याचे अधिकारी कायदा व सुव्यवस्थेची स्थिती पाहून योग्य तो निर्णय घेतील. विवाह सोहळे किंवा अंत्ययात्रेच्या जमावासाठी शासनाने वेळोवेळी दिलेले नियम व निर्बंध लागू राहतील. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि नागरिकांची सुरक्षा अबाधित राहावी, यासाठी प्रशासनाने हे पाऊल उचलले असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इंदिरा गांधींची हत्या करणाऱ्याच्या मुलाला विधानसभेचं तिकीट, पंजाब निवडणुकीसाठी पहिला उमेदवार जाहीर

DSK Case: डीएसके प्रकरणात ठेवीदारांना मोठा दिलासा; ५७२ कोटींच्या मालमत्ता लिलावाच्या अर्जावर तीन महिन्यांत निर्णय

IIT Bombay Exam: आयआयटी बॉम्बे परीक्षेत गैरप्रकार? कॉपीसाठी ७०० रूपयांच्या मोबाईलचा वापर, पोलिसांकडून तपास सुरू

Marathi News Live Updates : ‘केंद्रीय गृहमंत्र्यांनी देशाला वेठीस धरले’; खासदार प्रणिती शिंदेंचा आरोप

Vaibhav Sooryavanshi: वय अवघं १५, संपत्ती कोट्यवधींच्या घरात! वैभव सूर्यवंशीसोबत जोडले गेले ‘हे’ ५ मोठे ब्रँड; कमाईचा आकडा ऐकून व्हाल थक्क!

SCROLL FOR NEXT