

Indira Gandhi Case: Kehar Singh’s Son Gets Punjab Poll Ticket
Esakal
इंदिरा गांधी यांच्या हत्येचा कट रचणाऱ्याचा मुलगा आता पंजाब विधानसभा निवडणूक लढवणार आहे. तुरुंगात असलेला खलिस्तानी अमृतपाल सिंहच्या पार्टीने २०२७मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी पहिला उमेदवार जाहीर केलाय. अकाली दल म्हणजेच वारिस पंजाब देकडून सतवंत सिंह यांना उमेदवारी देण्यात आलीय. इंदिरा गांधी यांच्या हत्येचा कट रचल्या प्रकरणी केहर सिंहला फाशीची शिक्षा झालीय. त्याचा मुलगा असलेल्या सतवंत सिंह यांना फतेहगड साहीब जिल्ह्यातल्या बस्सी पठाणा मतदारसंघातून तिकीट देण्याची घोषणा अमृतपाल सिंहच्या पक्षाने केलीय.