नाशिक

साडेतीन लाखांत फसवणूक

CD
कृषी विभागात नोकरीचे आमिष देत गंडा ------ पिता-पुत्राकडून निवृत्त आगार व्यवस्थापकाची साडेतीन लाखांत फसवणूक सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २४ : शहरातील संभाजीनगरमधील निवृत्त व्यक्तीला गाठून तुमच्या मुलास कृषी विभागात कायम नोकरीवर लावून देतो, असे आमिष दाखवून दहा लाखांची मागणी केली होती. त्यापैकी साडेतीन लाख रुपये आगाऊ घेऊन गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे. येथील एसटी आगाराच्या व्यवस्थापकपदावरून निवृत्त झालेले नामदेव देवराम मोरे (वय ६६) यांची भारत एकनाथ गायकवाड व साहिल भारत गायकवाड (दोघे. रा. घाटनांद्रा जि. बुलढाणा) यांच्याशी ओळख झाली. या ओळखीचा गैरफायदा घेत पिता-पुत्राने नामदेव मोरे यांच्या उच्चशिक्षित मुलास कृषी विभागात नोकरीला लावून देतो, असे आमिष दिले. आमिषाला बळी पडून मोरे यांनी गायकवाड पिता-पुत्राला २३ डिसेंबर २०२२ ला तीन लाख रुपये ‘आरटीजीएस’द्वारे, तर ५० हजार रुपये रोख दिले होते. पैसे दिल्यानंतरही नोकरी लागत नाही, म्हणून ज्ञानेश्वर मोरे यांनी पैशांसाठी तगादा लावला. यामुळे दोघा पिता-पुत्राने धमकविण्यास सुुरुवात केली. अखेर नामदेव मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात पिता-पुत्राविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. उपनिरीक्षक संजय शेलार तपास करीत आहेत. मंत्रालयात सचिवांशी मैत्री मुंबईतील मंत्रालयात सचिवांसोबत उठबस असल्याबाबत भूलथापा देऊन मोरे यांच्या मुलास कृषी विभागातर्फे नोकरीसाठी प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींचे कात्रण पाठवून अमूक एक केंद्रातून परीक्षा देण्याच्या सूचना दिल्या. परीक्षा संपल्यावरही चौकशी लागली आहे, असे भासवून घेतलेले पैसे परत देण्याऐवजी उर्वरित साडेसहा लाखांसाठी दोघा भामट्यांनी मोरे कुटुंबीयांकडे तगादा लावला होता. भारत गायकवाड याने पैसे देण्यास टाळाटाळ करून बेपत्ता झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धडाका! डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह बड्या ब्रँड्सवर FDAची धाड; 5 परवाने निलंबित

IND vs SL 1st Test: देवदत्त पडिक्कल IN, सर्फराज खान OUT! गंभीरने खेळपट्टी पाहिली अन् Playing XI ठरली; जाणून घ्या संभाव्य संघ

Surat-Chennai Expressway : परंडा-तुळजापूर तालुक्यातील 31 गावांत भूसंपादन वेगात; शेतकऱ्यांना मिळणार कोट्यवधींचा मोबदला, 481 हेक्टर क्षेत्र ताब्यात

लाडक्या बहिणींना रक्षाबंधनला ३ हजार रुपये, पुन्हा सामाजिक न्याय विभागाकडून निधी वर्ग; राज्य सरकारचा मोठा निर्णय

IND vs SL 1st Test: गौतम गंभीरने खेळपट्टीची पाहणी केली, पाठ वळताच क्युरेटरने 'खेळी' खेळली; कॅप्टन, कोचने एकवटले... माईंड गेम

SCROLL FOR NEXT