नेहरुनगरात घरफोडी; तिघे अटकेत
जळगाव, ता. २४ : नेहरुनगरातील घरफोडीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी तिघा चोरट्यांना अटक केली. त्यांच्याकडून चोरीचे चांदीचे देव, सिलिंडर तसेच, पितळी व तांब्याची भांडी, असा एकूण २३ हजारांचा ऐवज हस्तगत केला. नेहरूनगरमध्ये गोविंद रामदास पाटील पत्नीसमवेत नातवंडाच्या भेटण्यासाठी ८ जूनला घराला कुलूप लावून गावी गेले होते. ते २० जूनला परतले. त्यांना घरचा दरवाजा उघडा दिसला. घरात पाहणी करून एमआयडीसी पोलिसांत चोरीची तक्रार दिली होती. निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकाने तांबापुरा परिसरात सापळा रचून दीपक राजू पाटील (वय २४) शाहरुख शहा सिकंदर शहा (दोघे रा. पंचशीलनगर, तांबापुरा), मुकेश राजू परमार (२२, गौतमनगर, तांबापुरा) या तिघांना अटक करून चोरीचा पूर्ण ऐवज परत मिळविला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.