NSK26H22425
जळगाव : कानळदा येथील प्राथमिक शाळेतील मुलांशी संवाद साधताना मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर.
शैक्षणिक प्रगती, आरोग्य सेवांबाबत आढावा
(उपशीर्षक)
सीईओ नायर यांची कानळदा येथे भेट; रस्ते कॉंक्रिटीकरणाची पाहणी
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता २५ : गावांना भेटी देण्याच्या मोहिमेदरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी बुधवारी कानळदा गावाला भेट दिली. या भेटी दरम्यान जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधून शैक्षणिक प्रगती तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवांबाबत आढावा घेतला. तसेच आव्हाणे गावाकडील सुरू असलेल्या रस्ता कॉंक्रिटीकरण कामाची पाहणी केली.
कानळदा येथे एकल महिलांच्या सन्मानार्थ आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहिल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट दिली. यावेळी त्यांनी प्रत्यक्ष वर्गात जाऊन विद्यार्थ्यांशी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून संवाद साधला. विद्यार्थ्यांना आद्याक्षरे वाचण्यास सांगून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीची माहिती घेतली.
आरोग्य सेवांचा आढावा
यानंतर कानळद्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन स्वच्छता, औषधसाठा व उपलब्ध आरोग्य सुविधांची पाहणी केली. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपस्थित असलेल्या आशा सेविकांशी संवाद साधून ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचविण्याबाबत चर्चा केली.
चौकट
रस्त्यांची गुणवत्ता राखा
दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी आव्हाणे फाटा ते आव्हाणे गावादरम्यान सुरू असलेल्या रस्ता काँक्रिटीकरण कामाचीही पाहणी केली. रस्त्याच्या कामाची गुणवत्ता उत्तम राखावी व कामात कोणत्याही प्रकारची तडजोड करू नये, अशा स्पष्ट सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या. यावेळी जळगावचे गटविकास अधिकारी सी. ए. बोढरे, शाखा अभियंता सतीश शिसोदे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
–––––––––
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.