नाशिक

केंद्र पुरस्कृत कापूस उत्पादकता अभियानांतर्गत तापी माई शेतकरी गटाला कापूस बियाण्यांचे वाटप

CD
NSK26H22475 जळगाव : कापूस बियाण्यांचे वाटप करताना सहाय्यक कृषी अधिकारी सुरेखा सपकाळे. -- कापूस उत्पादकता अभियानांतर्गत बियाण्यांचे वाटप सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २५ : महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने तालुका कृषी अधिकारी, जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र पुरस्कृत कापूस उत्पादकता अभियान २०२६-२७ अंतर्गत करंज येथे बुधवारी (ता. २४) एकात्मिक पीक व्यवस्थापन या घटकांतर्गत तापी माई शेतकरी गटाला कापूस पिकाच्या बियाण्यांचे शंभर टक्के अनुदानावर वाटप करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश कापूस पिकाची उत्पादकता वाढविणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देणे तसेच शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात बचत करून उत्पन्न वाढीस हातभार लावणे हा आहे. या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना उच्च दर्जाचे कापूस बियाणे मोफत उपलब्ध करून देण्यात आले. कार्यक्रमात सहाय्यक कृषी अधिकारी सुरेखा सपकाळे यांनी शेतकऱ्यांना कापूस लागवडीचे नियोजन, बियाण्यांचा योग्य वापर, पीक संरक्षण तसेच एकात्मिक पीक व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी शेतकऱ्यांना शास्त्रशुद्ध पद्धतीने शेती करण्याचे आवाहन केले. यावेळी करंज गावचे सरपंच समाधान प्रभाकर सपकाळे, उपसरपंच वासुदेव तुकाराम सपकाळे, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तापीमाई शेतकरी गटाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर शिवदास पाटील यांनी शासनाच्या या उपयुक्त योजनेबद्दल कृषी विभागाचे आभार मानले. या कार्यक्रमामुळे करंज परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले असून शासनाच्या कृषी योजनांचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विभाग सातत्याने प्रयत्नशील असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्यांनो लक्ष द्या! Meesho वरून खरेदी करता? तर आधी 'ही' बातमी नक्की वाचा; हायकोर्टाचा मोठा निर्णय

Video: "मला नरेंद्र नावाचा तिरस्कार...", PM मोदींना भारतीय बॉक्सरने सांगितलेला पाकिस्तानी खेळाडूचा किस्सा ऐकून आवरेना हसू

Marathi News Live Updates : भाजप आमदाराला गोळ्या घाल, पैसे देतो; दोघांनी ड्रायव्हरला दिली ऑफर, सोलापुरात गुन्हा दाखल

Sugar Price: राज्यात साखरेचा तुटवडा, सणासुदीत भाव आणखी भडकण्याची शक्यता, किलोमागे किती मोजावे लागणार?

Samruddhi Mahamarg News: महामार्गावर नेमकं काय घडलं? RTO अधिकाऱ्यांनी केला मोठा खुलासा; म्हणाले, ''ट्रक चालकाने...''

SCROLL FOR NEXT