जळगावात आजपासून कॅरम लीग स्पर्धा
(उपशीर्षक)
राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडूंसह ५६ जणांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २५ : जळगाव जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने तसेच जैन स्पोर्ट्स ॲकॅडमीच्या विद्यमाने आयोजित व जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड पुरस्कृत जळगाव कॅरम लीग- पर्व २ स्पर्धा २६ ते २८ जून दरम्यान आयोजित केली आहे. या स्पर्धेला उद्यापासून (ता.२६) कांताई सभागृहात सुरवात होत आहे.
जळगाव लीग कॅरम स्पर्धेत जिल्ह्यातील उत्कृष्ट ४८ व राज्यातील इतर जिल्ह्यांमधील जैन इरिगेशन व महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व केलेले आठ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विजेते खेळाडू सहभागी होणार आहेत. स्पर्धा प्रथम लीग पद्धतीने व नंतर बाद पद्धतीने खेळविण्यात येईल. स्पर्धेत पहिल्या चार क्रमांकाच्या संघांना रोख पारितोषिके आणि चषक अशा एकूण ६५ हजारांचे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे स्पर्धेतील सहभागी सर्व खेळाडूंना पदक देण्यात येणार आहे. ही स्पर्धा सिस्का कंपनीच्या बुलेट शॉट या कॅरम बोर्ड व सोंगट्यांसह खेळविण्यात येईल.
आठ संघात विभागणी
स्पर्धेतील सर्व ५६ खेळाडूंना आठ संघात विभागण्यात आलेले आहे. विभागलेले आठ संघ मकरा चॅलेंजर्स, आप्पासाहेब लिजेंड्स संघ, सालार किंग्स संघ, स्पोर्ट्स हाऊस स्ट्रायकर्स संघ, श्रीउत्तम हर्बल्स रायडर्स संघ, लीजर स्पोर्ट्स स्टार्स संघ, अरीश लायन्स संघ, साईनाथ टायटन्स संघ असे आहेत.
चौकट
स्पर्धेचे आज उद्घाटन
या स्पर्धेचे उद्घाटन उद्या (ता. २६) सकाळी दहाला प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. यानंतर प्रत्यक्ष स्पर्धेला सुरवात होईल. तरी जळगाव जिल्ह्यातील सर्व कॅरम व क्रीडाप्रेमींनी या स्पर्धेत येऊन कॅरमचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
–––
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.