नाशिक

जिल्ह्यातील ३२ केंद्रांवर १४ हजार ३२३ शिक्षकांची होणार टीईटी परिक्षा

CD
पान एक ॲंकर ----------------- 22478 नंदूरबार : टीईटी परिक्षेसंदर्भात आयोजित बैठकीस उपस्थित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, परीक्षा नियंत्रक भानुदास रोकडे. जिल्ह्यातील १४ हजार ३२३ शिक्षक देणार ‘टीईटी’ २८ जूनला दोन सत्रात परीक्षा; ३२ केंद्र संचालकांची नियुक्ती सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. २५ : शिक्षक पात्रता परीक्षा रविवारी (ता.२८) असून नंदुरबार शहरातील एकुण ३२ परीक्षा केंद्रांवर १४ हजार ३२३ शिक्षक ही परिक्षा देणार आहेत. सकाळ सत्रात १३ तर दुपारच्या सत्रात १९ केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या याहामोगी सभागृहात झालेल्या सभेत याबाबत केंद्र संचालकांना मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल तसेच परीक्षा नियंत्रक तथा शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीस प्रशिक्षण संस्थेचे विनोद लवाडे, सुभाष वसावे जेष्ठ अधिव्याखाता, जिल्हा परिरक्षक तथा उपशिक्षणाधिकारी निलेश लोहकरे, डॉ. युनूस पठाण, गटशिक्षणाधिकारी, झोनल अधिकारी, परीक्षा केंद्रांचे केंद्रसंचालक सहभागी झाले होते. दोन सत्रात नंदुरबार शहरातील ३२ केद्रांवर ही परीक्षा आयोजित केली जाणार आहे. सकाळ सत्रात १३ परीक्षा केंद्रावर ६ हजार २२० परीक्षार्थी तर दुपार सत्रात १९ परीक्षा केंद्रांवर ८ हजार १०६ असे एकूण १४ हजार ३२६ परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत. मार्गदर्शन सभेत सादरीकरणाद्वारे डॉ. युनूस पठाण यांनी नंदुरबार जिल्ह्यातील टीईटी परीक्षा कोणत्या पध्दतीने घेण्यात येणार आहे, याबाबत मार्गदर्शन केले. जिल्हा परिरक्षक यांनी प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही, उमेदवार तपासणीकरीता फिंगरप्रिन्ट व फेस स्कॅनर यंत्रणा कार्यान्वीत करण्याबाबत मार्गदर्शन केले. परीक्षा नियंत्रकरोकडे यांनी परीक्षेदरम्यान कोणती काळजी घ्यावी याबाबत सुचना दिल्या. यावेळी परीक्षा विषयक कामकाजाकडे गांर्भीयाने लक्ष देऊन कोणताही गैरप्रकार होणार नाही, याबाबतची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. दिव्यांग परीक्षार्थीसाठी परिषदेने दिलेल्या निर्देशबाबत सभेत सविस्तर माहिती देण्यात आली. परीक्षेसाठी परिरक्षक, सहाय्यक परिरक्षक व केंद्रसंचालक नियुक्त करणे, आवश्यक पोलिस बंदोबस्त उपलब्ध करुन देणे, गोपनिय साहित्य शासकीय कोषागारात ठेवणे, आवश्यक कर्मचारी वर्ग उपलब्ध करुन देणे, प्रत्येक परीक्षा केंद्रावर सी.सी टि.व्ही. उमेदवार तपासणीकरीता फिंगरप्रिन्ट व फेस स्कॅनर यंत्रणा कार्यान्वीत करणे या विषयांवर चर्चा करुन मार्गदर्शन करण्यात आले. नमन गोयल यांनी परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्‍यक त्या सुचना केल्या. तसेच प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री. रोकडे यांनी परीक्षा नियमांचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Toxic Liquor: पुण्यातील विषारी दारूकांडावरून विधान परिषदेत गदारोळ; सरकार संवेदनशील नसल्याचा विरोधकांचा आरोप, सत्ताधाऱ्यांचाही उलटवार

Shaktipeeth Highway Kolhapur ZP : कोल्हापूर जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता तरीही शक्तिपीठविरोधात ठराव; काँग्रेसच्या दबावामुळे भाजप सदस्यांचाही विरोध

कालीन भैया-गुड्डू पंडित पुन्हा आमनेसामने! 'मिर्झापूर'चा रक्तरंजित खेळ आता थिएटरमध्ये; 4 सप्टेंबरला होणार मोठा धमाका

Hasan Mushrif Gokul Election Controversy : हसन मुश्रीफांची जीभ घसरली; प्रशासक मंडळाला धरले धारेवर, ठरावात संकलनावेळी गोंधळ, असं काय बोलले?

Bank Holiday: आज मोहरमनिमित्त बँका बंद की सुरू? पाहा RBI ची अपडेट, सलग 3 दिवस...

SCROLL FOR NEXT