नाशिक

सोने चांदीच्या दरात मोठी घसरण

CD
आठवडाभरात सोन्‍याचे भाव दहा हजारांनी कमी (उपशीर्षक) सोने एक लाख ४० हजार रुपयांवर; चांदीतही मोठी घसरण सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २५ ः येथील सराफा बाजारात गुरुवारी (ता. २५) सोन्याच्या भावात तीन हजार, चांदीत पाच हजार रुपयांनी घसरण झाली. दरम्‍यान, गेल्या आठ दिवसांत सोने दहा हजारांनी, तर चांदी वीस हजार रुपयांनी कमी झाली आहे. यामुळे दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतीमधील बदल, डॉलरच्या मूल्यातील चढ-उतार आणि गुंतवणूकदारांचा बदलता कल यामुळे मौल्यवान धातूंच्या किमतीवर परिणाम होत आहे. परिणामी, देशांतर्गत बाजारातही सोने आणि चांदीच्या भावात घसरण होत आहे. दोन दिवसांपासून सोन्या-चांदीच्‍या भावात मोठी घसरण झाल्‍याचे दिसून येत आहे. चांदी पुन्‍हा पाच हजारांनी खाली गेल्‍या आठवड्यापासून चांदीचे भाव २० हजार रुपयांनी खाली आले आहेत. गुरुवारी चांदी दर पाच हजार रुपयांनी खाली आली. दोन लाख २० हजार (प्रतिकिलो, विनाजीएसटी) रुपयांपर्यंत चांदी खाली आली आहे. याशिवाय सोने एक लाख ४३ हजार रुपयांवरून (प्रतिदहा ग्रॅम, विनाजीएसटी) एक लाख ४० हजार रुपयांपर्यंत खाली आले आहे. यानंतर सलग दोन दिवसांपासून भाव कमी झाले आहेत. आठवडाभरातील सोन्या-चांदीचे भाव तारीख--- सोने (प्रतिदहा ग्रॅम)--- चांदी (प्रतिकिलो, विनाजीएसटी) १८ जून--- १ लाख ४८ हजार ६००--- २ लाख ४७ हजार १९ जून--- १ लाख ४५ हजार ५००--- २ लाख ३७ हजार २१ जून--- १ लाख ४५ हजार ३००--- २ लाख ३७ हजार २२ जून--- १ लाख ४६ हजार ५००--- २ लाख ४२ हजार २३ जून--- १ लाख ४४ हजार ५००--- २ लाख ३० हजार २४ जून--- १ लाख ४३ हजार------ २ लाख २५ हजार २५ जून--- १ लाख ४० हजार------ २ लाख २० हजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Independence Day Live Update : जागतिक बाजारपेठेत भारतीय उत्पादनांसाठी मोठी संधी; लघु उद्योगांना पंतप्रधान मोदींचे आवाहन

Mumbai Local Megablock: मुंबईकरांसाठी महत्त्वाचे! रविवारी लोकल उशिराने धावणार, 'या' मार्गावर मेगाब्लॉक; कसे असेल नियोजन?

Koyna Dam Water Level : महाराष्ट्राची 'भाग्यलक्ष्मी' 100 टीएमसीच्या उंबरठ्यावर! कोयना धरणात 97 टीएमसी पाणीसाठा; सांगली-सातारा अन् कर्नाटकाची चिंता मिटली

IND vs SL: भारत खेळणार 600वा कसोटी सामना; ‘या’ दोन संघांनंतर ऐतिहासिक क्लबमध्ये होणार एंट्री, कोणत्या देशाने खेळले 1000हून अधिक सामने!

Vishwas Nangare Patil: विश्‍वास नांगरे पाटील यांना अतिउत्कृष्ट सेवा पदक, रेड्डींसह दहा पोलिस होणार सन्मानित

SCROLL FOR NEXT