मेन
लोगो : अंमली पदार्थविरोधी दिन
....
अडीच वर्षात पावणेदोनशे ड्रग्ज तस्करांना बेड्या
पोलिसांचा दणका; अडीच कोटींचे अंमली पदार्थ जप्त
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २५ : शहरात अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी करडी नजर ठेवल्याने अडीच वर्षात पोलिसांनी ८४ गुन्हे दाखल करीत २ कोटी ३५ लाखाच्या अंमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे. तसेच, १८२ तस्करांना बेड्या ठोकल्या आहेत. विशेषत: तर, सहा महिन्यांमध्ये एमडीसह गांजा, भांग असा अंमली पदार्थांचा साठा जप्त करीत ३८ संशयितांना अटक केली.
आयुक्त कर्णिक यांनी नोव्हेंबर २०२३ मध्ये पदभार स्वीकारल्यानंतर, शहरात गोमांस व अंमली पदार्थाविरोधात कठोरपणे कारवाईसाठी पोलिस आणि गुन्हे शाखांना मोकळीक दिली होती. तसेच अंमली पदार्थांविरोधात कारवाईसाठी आयुक्त कर्णिक यांनी अंमली पदार्थविरोधी पथक कार्यान्वित केले आणि या पथकाने अडीच वर्षांमध्ये एमडीसह गांजा, भांग, चरस असा २ कोटी ३५ लाख १० हजार १६१ रुपयांचा अंमली पदार्थांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर गत सहा महिन्यांमध्ये शहरात एमडी विक्री करणाऱ्या २४ संशयिताला अटक केली. एमडी माफिया ललित पानपाटीलचा शिंदेगावातील कारखाना उद्ध्वस्त केल्यानंतर पोलिसांनी वडाळागावातील ‘छोटी भाभी’चे एमडीचे नेटवर्क उद्ध्वस्त केले. त्यापाठोपाठ नाशिक रोडच्या सनी पगारे, अर्जुन पिवाल यांचा सोलापूरातील एमडी बनविण्याचे कारखाने उद्ध्वस्त केले.
वर्ष.......अंमली पदार्थ .... गुन्हे ..... मुद्देमाल ..... किमत..... संशयित
२०२४
- एमडी .... ११.... ४४६.०४ ग्रॅम...... २१,०२,२२० रु. .... २९
- गांजा .... १६ .... २६८ कि.५३९ ग्रॅ..... ३,८७, ७४४१ रु. .... ३१
एकूण : २७..... ......... ५९,७९,६६१ रु. ..... ६०
२०२५
- एमडी .... २३..... ४९३ ग्रॅम .... ४०,४२,५१५ रु. .... ६५
- गांजा .... ११ ..... ५५ कि. ३४४ ग्रॅ..... १०,१५,४८५ रु. ..... १३
- चरस ..... १ .... ४९ ग्रॅम .... २४,५०० रु. ..... १
भांग ..... ३ ..... २८० कि.३९३ ग्रॅ. .... २,८३,८९० रु. ..... ५
एकूण : ... ३८.... .... ५३,६६,३९० रु. ...... ८४
--
२०२६ (जानेवारी ते आजपर्यंत)
- एमडी ..... १२ .... ५५९ ग्रॅ.३९८ मि. ..... ७१,७१,७१०रु. .... २४
- गांजा .... ०३ ..... ३७ कि. ४३६ ग्रॅ. ...... १२,७८,७६० रु. .... ०८
- अफेटामाईन .... ०१ .... ४८७ ग्रॅ. .... २४,३५,००० रु. ..... ०३
- भांग ..... ०३..... २४९ ग्रॅ. ..... १२, ७८, ७६० रु. .....०३
एकूण : १९ ..... ----..... १,२१,६४,२३० रु. ..... ३८
...........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.