नाशिक

तापमानात तब्बल ८ अंशांची घसरण

CD
ॲंकर स्केच किंवा एआय वापरता येईल --- दोन दिवसांत तापमानात तब्बल ८ अंशांची घसरण (उपशीर्षक) बदलत्या हवामानाचा आरोग्यावर परिणाम; पारा आला ४१ वरून ३३ अंशांवर सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २५ : पंधरा दिवस उशिराने आलेल्‍या पावसाने वातावरणात मोठा बदल झाला आहे. दोन दिवसांपूर्वी ४१ अंशांपर्यंत असलेल्‍या तापमानात गेल्या दोन दिवसांत तब्बल ८ अंश सेल्सिअसची घसरण झाली आहे. हवेत गारवा निर्माण झाल्‍याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, तापमानातील झालेला अचानक बदल आरोग्यासाठी त्रासदायक ठरत असून सर्दी, ताप, अंगदुखीचा त्रास अनेकांना होत आहे. जून महिन्‍यातील पहिल्‍या तीन आठवड्यात मे हिटचाच तडाखा सहन करावा लागत होता. जळगाव जिल्‍ह्यातील तापमान सातत्‍याने ४० अंशाच्‍या वर राहिले. जूनच्‍या दुसऱ्या आठवड्यात तर पारा ४२ अंशांपर्यंत गेला होता. यामुळे कधी नव्‍हे ते जून महिन्‍यात देखील उष्‍णतेच्‍या झळा जाणवत होत्‍या. यासोबत हवेतील आर्द्रता वाढल्‍याने उकाड्यात देखील प्रचंड वाढ झाली होती. परंतु, तीन दिवसांपासून वातावरणात बदल झाला असून पावसाचे देखील आगमन झाले आहे. यामुळे तापमान ३३ अंशांपर्यंत खाली आले आहे. काही दिवसांपूर्वी तीव्र उष्णतेचा सामना करणाऱ्या नागरिकांना आता तुलनेने थंड वातावरणाचा अनुभव येत आहे. उष्णतेतून अचानक गारवा गेल्या आठवड्यात जिल्‍ह्यातील अनेक भागांत तापमान ४० अंशांच्या आसपास पोहोचले होते. तर काही भागात ४१ अंशांपर्यंत पारा होता. मात्र सोमवारपासून ढगाळ वातावरण, वाऱ्याचा वेग वाढणे आणि काही ठिकाणी झालेल्या पावसामुळे तापमानात लक्षणीय घट झाली. तर दोन दिवसांपासून पाऊस जिल्‍ह्यात सक्रिय झाला असल्‍याने दोन दिवसांत ८ अंशांची घसरण नोंदविण्यात आल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. चौकट बदलाचा आरोग्यावर परिणाम एकवेळ तापमान ४० अंशांच्‍या वर असताना आता हेच तापमान ३३ अंशांवर आले आहे. या हवामानातील अचानक झालेल्‍या बदलामुळे शरीराला नवीन परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे आरोग्‍यावर त्‍याचा परिणाम जाणवू लागला आहे. सद्यस्थितीला अनेकांना सर्दी, खोकला, ताप, घशात खवखव, डोकेदुखी आणि अंगदुखीचा त्रास जाणवत आहे. यामुळे दवाखान्‍यात देखील गर्दी होऊ लागली आहे. –––– कोट वातावरणात अचानक बदल झाल्‍यामुळे शरिराला वातावरणाशी जुळून घ्यायला थाेडा वेळ लागतो. ही परिस्थिती सध्‍या निर्माण झाली असून, वातावरण अचानक थंड झाल्‍याने त्‍याचा आरोग्‍यावर परिणाम होत असल्‍याने रूग्‍ण संख्‍या वाढली आहे. - डॉ. राहुल पाटील, जनरल फिजिशियन. –

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local : मुंबईकरांसाठी खुशखबर! उद्यापासून १५ डब्यांच्या आणखी २२ लोकल फेऱ्या

Shravan Jivati Pujan 2026: जिवतीचा कागद, गूळफुटाण्याचा नैवेद्य अन् चार शुक्रवार; काय असते श्रावणात केली जाणारी जिवतीची पूजा?

अखेर जेठालाल- बबिताचं लग्न झालं! दयाबेनने वाढलं जेवण; दिग्दर्शकाला नाही जमलं ते AI ने करून दाखवलं; व्हिडिओ होतोय व्हायरल

Virar News : बोरीवली स्थानकावर थांबला प्रवास, पण सुरू झाली नव्या आयुष्याची वाट

Service Medals: वीरता-सेवा पदकांची घोषणा! CRPF ला सर्वाधिक पदकं; देशाच्या सुरक्षेसाठी प्राण पणाला लावणाऱ्या जवानांचा सन्मान

SCROLL FOR NEXT