नाशिक

नाशिकमध्ये दोन दिवसीय ‘लुप्त होणाऱ्या कलांचा’ महोत्सव

CD
‘लुप्त होणाऱ्या कलांचा’ महोत्सव रविवारपासून सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २५ : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे लोककला संवर्धन आणि नव्या पिढीपर्यंत पारंपरिक कलांचा वारसा पोचविण्याच्या उद्देशाने ‘लुप्त होणाऱ्या कलांचा’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव २८ व २९ जूनला दुपारी १ ते ६ वाजेपर्यंत महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित स्मीताताई हिरे कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स, पंचवटी येथे आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमामध्ये राज्यातील विविध पारंपरिक लोककला प्रकारांचे सादरीकरण, प्रात्यक्षिके, संवाद आणि मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. लोककला क्षेत्रातील अभ्यासक व कलाकार प्रा. योगेश माणिकराव चिकटगावकर, शाहीर प्रवीण जाधव आणि प्रा. विकास कोकाटे हे शिबिर संचालक म्हणून सहभागी होणार असून लोककलांचे सांस्कृतिक, सामाजिक आणि ऐतिहासिक महत्त्व याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. महोत्सवामध्ये भारूड, पिंगळा, बतावणी, पोतराज, दशावतार, तमाशा, शाहिरी, लावणी, वासुदेव आणि लोकगीते या पारंपरिक कला प्रकारांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. आधुनिक मनोरंजनाच्या वाढत्या प्रभावामुळे उपेक्षित ठरत असलेल्या या लोककलांचे जतन व संवर्धन करण्यासाठी हा महोत्सव महत्त्वपूर्ण ठरणार आहे. उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना, संशोधकांना, कलारसिकांना आणि सर्वसामान्य नागरिकांना महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला परंपरेची जवळून ओळख करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच लोककलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देत त्यांच्या कलेला प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्टही या महोत्सवामागे आहे. कलाप्रेमी, विद्यार्थी, शिक्षक, संशोधक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : रेल्वे तिकीट तपासणीला आता बॉडी कॅमेऱ्याची नजर! १५ बॉडी कॅमेरे, ३० खास जॅकेट; एसी लोकलमध्ये विशेष देखरेख

‘गौतम गंभीर चांगला माणूस आहे, पण कोच म्हणून...’; हरभजन सिंगच्या या वक्तव्याने क्रिकेटविश्वात चर्चांना उधाण; नेमकं काय म्हणाला?

Sakal Tourism Expo 2026 : पुणेकरांना मिळणार पर्यटनाची मेजवानी! ‘सकाळ टुरिझम एक्स्पो २०२६’ २१ ते २३ ऑगस्टदरम्यान

Sakal Impact : ३ हजार ५६ विद्यार्थ्यांना दिलासा! कचरावेचकांच्या मुलांच्या शिष्यवृत्तीचा मार्ग अखेर मोकळा; ३० सप्टेंबरपर्यंत खात्यात जमा होणार शिष्यवृत्ती

Koyana Dam Water Release : कोयना धरणातून पाणी सोडण्यात येणार; कृष्णा-कोयना नदीकाठी सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT