नाशिक

शेत रस्त्यांसाठी ५० कोटी मंजूर

CD
शेतरस्त्यांसाठी ५० कोटी मंजूर जिल्ह्यातील नऊ तालुक्यांना पाच ते साडेसात कोटींचा निधी सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २५ : मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्त्यांसाठी राज्य शासनाने निधी मंजूर केला आहे. नाशिक जिल्ह्यातील नऊ तालुक्यांना ५० कोटी रुपये मिळणार असून, बागलाण मतदारसंघास साडेसात कोटी रुपये मिळतील. मात्र यात मालेगाव आणि नांदगावचा समावेश नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. --------------- ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतापर्यंत जाण्यासाठी बारमाही पक्के रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने पाणंद रस्ते योजना सुरू केली. त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जातो. महसूल व वन विभागाने २३ जून २०२६ ला शासनादेश प्रसिद्ध करत जिल्ह्यातील नऊ तालुक्यांना एकूण ५० कोटी रुपये मंजूर केले. यात कळवण, येवला, सिन्नर, निफाड, दिंडोरी, देवळाली, इगतपुरी या मतदारसंघांचा समावेश आहे. त्यांना प्रत्येकी पाच कोटी रुपये मिळतील. योजनेच्या पहिल्या टप्प्यासाठी शासनाने एक हजार कोटी रुपये निधी मंजूर केला होता. सीएसआर फंडातूनही निधी जमा केला जाणार आहे. शासनाने ३० मे २०२६ ला या संदर्भात प्रशासकीय मान्यता दिलेली होती. मात्र, त्यात दुरुस्ती करून सुधारित आदेश जारी केला. त्यानुसार ५० टक्के काम पूर्ण झाल्याशिवाय निधी मागणी नोंदविता येणार नाही. काम पूर्ण झाल्यानंतर काम पूर्णत्वाचा दाखला त्वरित अपलोड करण्याचे आदेश दिले आहेत. … १६-१ मालेगाव, नांदगावचा समावेश नाही शेत पाणंद रस्ते ही योजना ग्रामीण भागातील मतदारसंघासाठी असल्यामुळे शहरी मतदारसंघ त्यातून वगळले आहेत. पण त्यासोबतच जिल्ह्यातील मालेगाव व नांदगाव या दोन मतदारसंघांचाही सुधारित आदेशात समावेश नसल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. ----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्यांनो लक्ष द्या! Meesho वरून खरेदी करता? तर आधी 'ही' बातमी नक्की वाचा; हायकोर्टाचा मोठा निर्णय

Video: "मला नरेंद्र नावाचा तिरस्कार...", PM मोदींना भारतीय बॉक्सरने सांगितलेला पाकिस्तानी खेळाडूचा किस्सा ऐकून आवरेना हसू

Marathi News Live Updates : भाजप आमदाराला गोळ्या घाल, पैसे देतो; दोघांनी ड्रायव्हरला दिली ऑफर, सोलापुरात गुन्हा दाखल

Sugar Price: राज्यात साखरेचा तुटवडा, सणासुदीत भाव आणखी भडकण्याची शक्यता, किलोमागे किती मोजावे लागणार?

Samruddhi Mahamarg News: महामार्गावर नेमकं काय घडलं? RTO अधिकाऱ्यांनी केला मोठा खुलासा; म्हणाले, ''ट्रक चालकाने...''

SCROLL FOR NEXT