नाशिक

एक दिवसाच्‍या पावसाने रस्‍त्‍याने दैना

CD
मेन फिचर NSK26H22490 जळगाव : हिरा-शिवा कॉलनीतील रस्‍त्‍यावरील चिखलात अडकलेले मालवाहू वाहन. --- NSK26H22491 शिवमनगरात चिखलात अडकलेली मिनी बस ट्रॅक्‍टरच्‍या सहाय्याने बाहेर काढताना. --- NSK26H22492 शिवमनगरातील रस्‍त्‍यावर झालेला चिखल. ---- शहरातील रस्‍त्‍यांची एकाच पावसाने दाणादाण उपशीर्षक) शिवमनगर, शंभूराजे कॉलनीत बिकट परिस्थिती; चिखलात अडकल्‍या स्‍कूल व्‍हॅन सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २५ : शहरातील अनेक भागात आजही रस्‍त्‍यांची कामे झालेली नाहीत. कच्‍चे रस्‍ते असल्‍याने नागरिकांना मोठ्या समस्‍येला तोंड द्यावे लागत असते. याचा प्रत्‍यय शहरात बुधवारी झालेल्‍या पहिल्‍याच पावसात आला आहे. या पावसामुळे प्रभाग ९ मधील शिवमनगर, शंभूराजे कॉलनी, हिरा शिवा कॉलनीतील रस्‍त्‍यांवर चिखल झाला असून गुरुवारी विद्यार्थ्यांना ने- आण करणाऱ्या व्‍हॅन चिखलात अडकल्‍या होत्‍या. जळगाव शहर व परिसरात दोन दिवस झाले पाऊस होत आहे. मॉन्सूनचा हा पहिलाच पाऊस आहे. या पावसामुळे शहरातील अनेक भागामधील रस्‍त्‍यांची दैना झाली आहे. महापालिका प्रशासनाकडून वाढीव वस्‍तीच्‍या भागात पक्‍के रस्‍ते करण्याच्‍या कामाकडे दुर्लक्ष केले जात आहे. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. विशेष म्‍हणजे प्रभाग क्रमांक ९ मध्‍ये महापालिकेतील उपमहापौर व स्‍थायी समिती सभापती ही दोन प्रमुख पद असताना देखील प्रभागातील नागरिकांच्‍या समस्‍या सुटत नसल्‍याची ओरड नागरिकांमधून होत आहे. शिवमनगरातील रस्‍त्‍यावर चिखल शिवमनगरातील रस्‍त्‍याची परिस्थिती पहिल्‍या पावसातच बिकट झाली आहे. या भागातील नागरिकांकडून नगरसेवकांकडे पक्‍का रस्‍ता करण्याची मागणी अनेक दिवसांपासून केली जात आहे. परंतु, याकडे दुर्लक्ष केले जात असल्‍याने पहिल्‍या पावसातच नागरिकांना चिखलातून प्रवास करावा लागत आहे. पहिला पाऊस पडताच ही अवस्था झाली आहे, तर पुढे काय होईल? असा प्रश्‍न नागरिकांनी उपस्थित केला आहे. यामुळे किमान पावसाळ्यापुरते रस्‍त्‍यावर मुरूम टाकण्याचे काम लवकर करावे, अशी मागणी शिवमनगर, संत सावता माळीनगर परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे. चौकट चिखलामुळे विद्यार्थ्यांचे हाल शिवमनगरसह हिरा- शिवा कॉलनी, शंभूराजे कॉलनी ते साई विहारपर्यंतचा रस्‍त्‍यावर चिखल झाला आहे. यामुळे रस्‍त्‍यावरून गाडी नेणे आता जिकरीचे झाले आहे. शिवाय पायी जाणे देखील कठीण होत आहे. बुधवारी (ता.२४) दिवसा व रात्री झालेल्‍या पावसामुळे रस्‍त्‍यावर संपूर्ण चिखल झाला असून आज सकाळी विद्यार्थ्यांना शाळेत नेण्यात आलेल्‍या व्‍हॅन चिखलात अडकल्‍या होत्‍या. यामुळे मुलांना देखील चिखलातून मार्ग काढावा लागल्‍याचे चित्र आज होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Toxic Liquor: पुण्यातील विषारी दारूकांडावरून विधान परिषदेत गदारोळ; सरकार संवेदनशील नसल्याचा विरोधकांचा आरोप, सत्ताधाऱ्यांचाही उलटवार

Shaktipeeth Highway Kolhapur ZP : कोल्हापूर जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता तरीही शक्तिपीठविरोधात ठराव; काँग्रेसच्या दबावामुळे भाजप सदस्यांचाही विरोध

कालीन भैया-गुड्डू पंडित पुन्हा आमनेसामने! 'मिर्झापूर'चा रक्तरंजित खेळ आता थिएटरमध्ये; 4 सप्टेंबरला होणार मोठा धमाका

Hasan Mushrif Gokul Election Controversy : हसन मुश्रीफांची जीभ घसरली; प्रशासक मंडळाला धरले धारेवर, ठरावात संकलनावेळी गोंधळ, असं काय बोलले?

Bank Holiday: आज मोहरमनिमित्त बँका बंद की सुरू? पाहा RBI ची अपडेट, सलग 3 दिवस...

SCROLL FOR NEXT