नाशिक

दीपनगर वीज निर्मिती केंद्र गैरव्यवहार

CD
भुसावळ वीजनिर्मिती केंद्रात कोटींचा गैरव्यवहार उपशीर्षक एकनाथ खडसे : चौकशी सुरू, दोषींवर कारवाईचे फडणवीसांचे उत्तर सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २५ : भुसावळ येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात गेल्या काळात ‘व्हेरिएबल कॉस्ट’अंतर्गत इंधनाव्यतिरिक्त इतर कामांवर नियमबाह्य खर्च होऊन सुमारे १५० कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे समोर आल्याचा मुद्दा विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांनी उपस्थित करून चौकशीबाबत विचारणा केली. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देताना या प्रकरणाची चौकशी सुरू असून, दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. विधिमंडळात श्री. खडसे यांनी बुधवारी भुसावळ येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील गैरव्यवहाराचा मुद्दा मांडला. या वीजनिर्मिती केंद्रात अतिरिक्त खर्चाच्या नावाखाली १५० कोटींचा गैरव्यवहार झाल्याबाबत निवेदन स्थानिक लोकप्रतिनिधींनी ‘महाजेनको’च्या व्यवस्थापकीय संचालकांना दिले आहे. त्यामुळे महामंडळाचे मोठे नुकसान झाले असून, त्यात काही वरिष्ठ अधिकारी सहभागी असल्याचे निवेदनात म्हटले आहे. असे असताना या प्रकरणाची चौकशी सुरू आहे का, असा प्रश्‍न खडसेंनी उपस्थित केला. तसेच, अन्य एका वीजनिर्मिती केंद्रातही अशाच स्वरूपाचा ३०० कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा मुद्दाही त्यांनी मांडला. त्यावर फडणवीसांनी उत्तर देताना महानिर्मिती कंपनीला या गैरव्यवहारासंबंधी निवेदन प्राप्त झाल्याचे मान्य करून त्यासंबंधी चौकशीसाठी पाच सदस्यीय समिती महानिर्मिती कंपनीने नेमली आहे, त्याची चौकशीही सुरू आहे. यात कुणी दोषी आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी विधिमंडळात स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG LNG Ships: मोठा दिलासा! 'होर्मुज'मधून 'एवढी' जहाजं भारताकडे रवाना, 26 जहाजं अजूनही आहेत रांगेत

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला प्रतिकिलो ३० रुपये बाजारभाव

PI Ranjankumar Sharma : हलगर्जीपणा करणाऱ्यांचे थेट निलंबन; गुन्हेगारांचे कंबरडं मोडणार, दृष्य पोलिसिंगवर अधिक भर

Vaccine QR Code: मोठा निर्णय! आता स्कॅन करा आणि औषधाची माहिती मिळवा; सरकारने औषध पॅकेजिंगचे नियम बदलले

Nasrapur Crime Case : भीमराव कांबळे दोषी; मृत्युदंड की जन्मठेपेची शिक्षा यावर सोमवारी निकाल

SCROLL FOR NEXT