नाशिक

लसीचा नमुना तपासणीसाठी पाठवला

CD
मुख्य पान-३ ------------ ३६-३ लशीचा नमुना उच्चस्तरीय तपासणीस ----------- सिडकोतील युवती मृत्यू प्रकरण ः लस घेतलेले इतर १२० सुरक्षित ----------- सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २५ : सिडकोतील कामटवाडे परिसरातील दक्षिणमुखी हनुमान मंदिराजवळील शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रात लस घेतल्यानंतर सोळा वर्षीय युवतीच्या मृत्यू प्रकरणी महापालिकेने चौकशी सुरू केली आहे. संबंधित लशीचा नमुना उच्चस्तरीय तपासणीसाठी पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ------------- कामटवाडे शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी बाह्य लसीकरण सत्र घेतले जाते. बुधवारी झालेल्या सत्रात श्रावणी अनिल पाटील हिला दुपारी १२.४० ला धनुर्वात आणि घटसर्प प्रतिबंधक लस देण्यात आली. लस घेतल्यानंतर घरी परताना तिला चक्कर येऊन ती बेशुद्ध पडली. नातेवाइकांनी तिला प्रथम खासगी रुग्णालय आणि नंतर जिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच तिला मृत घोषित करण्यात आले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी पाठविला. महापालिकेचे मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय देवकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रावणीला ज्या व्हायलमधून लस देण्यात आली त्याच व्हायलमधून आणखी पाच जणांना लस देण्यात आली होती. त्यात चार गर्भवती महिला, एक १६ वर्षीय मुलगी आणि एक १० वर्षीय मुलगा यांचा समावेश आहे. या पाच जणांपैकी कोणालाही कोणताही त्रास झालेला नाही. त्याच केंद्रावर आतापर्यंत १२० जणांना लसीकरण करण्यात आले. लस घेतलेल्या सर्वांशी संपर्क साधून चौकशी केली असता कोणीही अस्वस्थ नसल्याचे समोर आले आहे. ------------------ चौकट अहवालानंतरचे निष्कर्ष गुरुवारी (ता. २५) जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात एईएफआय समितीची बैठक होऊन संबंधित लशीचा नमुना सखोल तपासणीसाठी पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. ही लस केंद्र सरकारमार्फत महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला पुरविली जाते. कामटवाडे केंद्राला मिळालेल्या २४ व्हायलपैकी १२ व्हायल वापरल्या गेल्या आहेत. मृत्यूचे नेमके कारण काय आहे, याबाबत चौकशी सुरू असून, तपासणी अहवालानंतरच पुढील निष्कर्ष काढता येईल, असे वैद्यकीय विभागाने स्पष्ट केले आहे. ------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Holiday: आज मोहरमनिमित्त बँका बंद की सुरू? पाहा RBI ची अपडेट, सलग 3 दिवस...

Bhiwandi Minor Assault Case : भिवंडीत संतापजनक घटना! ७ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, आरोपीने फ्लॅटमध्ये बोलावले अन्...

Tukaram Mundhe: विधानसभेत मोठी घोषणा; FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली नाही, भेसळ माफियांना धक्का!

Nashik Tourism : नाशिकच्या 'या' प्रसिद्ध पर्यटनस्थळांवर रील बनवण्यास आणि सेल्फी घेण्यास बंदी! उल्लंघन केल्यास कारवाई; हरिहरगडावर दिवसाला 300 पर्यटकांनाच प्रवेश

Pune PWD: पुणे ‘पीडब्ल्यूडी’चा कारभार रामभरोसे! मुख्य अभियंत्याअभावी कर्मचाऱ्यांच्या मुंबईच्या फेऱ्या,अडीच महिन्यांपासून मुख्य अभियंता नाही

SCROLL FOR NEXT