धुळे : टुडे पान ३ साठी..अँकर
--
फोटो क्रमांक : 22480
सांजोरी (ता. धुळे) : कृषी विद्यापीठाच्या फुले समृद्ध ग्राम उपक्रमांतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ. गोरक्ष ससाणे. शेजारी कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ, लुपिन फाउंडेशनचे पदाधिकारी आदींसह शेतकरी.
--
सांजोरीत फुले समृद्ध ग्रामांतर्गत शेतकरी प्रशिक्षण
--
शेतकऱ्यांनी कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे तज्ञांचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २५ : राहुरी (जि. अहिल्यानगर) येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, धुळे आणि लुपिन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सांजोरी (ता. धुळे) येथे एकदिवसीय शेतकरी प्रशिक्षण व आढावा बैठक नुकतीच झाली. राहुरी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनेतून ‘फुले समृद्ध ग्राम’ हा उपक्रम राबविला जात असून या अंतर्गत सांजोरी गावाची निवड करण्यात आली आहे. गावाला कृषी क्षेत्रात समृद्ध आणि स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे होते. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी विद्यापीठ संशोधित तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.
बैठकीत गावातील कृषी विकासाचा आढावा घेण्यात आला. तसेच, आधुनिक शेती तंत्रज्ञानाविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षण बैठकीला कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख डॉ. डी. आर. नांद्रे, राहुरी विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण विभागाचे प्रा. डॉ. पंडित खर्डे, विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ. सचिन सदाफळ यांनी शेतकऱ्यांना विद्यापीठाच्या विविध योजना आणि विस्तार कार्याची माहिती दिली. मृदा शास्त्रज्ञ डॉ. अतिश पाटील यांनी माती परीक्षण व जमिनीच्या सुपीकतेचे महत्त्व विशद केले. कृषी विद्या शास्त्रज्ञ जे. व्ही. कथेपुरी यांनी आधुनिक पीक व्यवस्थापन पद्धतींवर माहिती दिली. पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय शास्त्रज्ञ डॉ. डी. एम. चौधरी यांनी पूरक व्यावसायिक दृष्टिकोनातून पशुपालनाविषयी मार्गदर्शन केले. लुपिन फाउंडेशनच्या कुसुंबा (ता.धुळे) क्लस्टरचे प्रकल्प अधिकारी विनोद मासुळे यांनी संस्थेच्या वतीने राबवल्या जाणाऱ्या ग्रामीण विकास प्रकल्पांची माहिती दिली. या संयुक्त उपक्रमामुळे सांजोरी परिसरातील शेतीला आणि शेतकरी बांधवांना आधुनिकतेची नवी दिशा मिळाली आहे. शासकीय कृषी महाविद्यालय, बाजरा संशोधन केंद्र, शासकीय कृषी तंत्र विद्यालय, कृषी विभाग व पशुसंवर्धन विभाग यांच्या समन्वयाने सांजोरी गाव आदर्श ‘फुले समृद्ध ग्राम’ म्हणून नावारूपास येईल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला. जगदीश काथेपुरी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. धनराज चौधरी यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.