नाशिक

सिटीलिंकमध्ये आता डिजिटल तिकीट सुविधा

CD
फोटो : H22501 ----------------- महापौर, उपमहापौरांनी केला बस प्रवास सिटीलिंकच्या डिजिटल तिकीट प्रणालीचे उद्‌घाटन सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २५ : नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या सिटीलिंक बसमध्ये प्रवाशांसाठी डिजिटल तिकीट काढण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. या अत्याधुनिक यंत्रणेचा शुभारंभ गुरुवारी (ता. २५) महापौर हिमगौरी आहेर आणि उपमहापौर विलास शिंदे यांच्या हस्ते राजीव गांधी भवन बस स्टॉप येथे झाला. शुभारंभानंतर महापौर आणि उपमहापौरांनी राजीव गांधी भवन ते कुलकर्णी गार्डन असा बस प्रवास करून प्रत्यक्ष डिजिटल तिकीट काढले. यापुढे प्रवाशांना बसमध्येच युपीआय, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड या माध्यमातून त्वरित, सुलभ आणि सुरक्षितपणे तिकीट मिळणार आहे. त्यामुळे सुट्ट्या पैशांवरून वाहक आणि प्रवासी यांच्यात होणारे वाद टळतील, तसेच तिकीट वितरण प्रक्रिया अधिक वेगवान, पारदर्शक आणि अचूक होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. सिटीलिंकचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार मुंडे यांनी सांगितले की, प्रवाशांसाठी तंत्रज्ञानाधारित आणि स्मार्ट सेवा देण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल आहे. नागरिकांनी या डिजिटल सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले. कार्यक्रमाला मुख्य महाव्यवस्थापक बाजीराव माळी, महाव्यवस्थापक राहुल तोरो, रघुनाथ कांबळे, उपमहाव्यवस्थापक संजय सुर्वे, विकास जोशी, जनसंपर्क अधिकारी दीपाली घाटोळ, आयटी व्यवस्थापक दिनेश देसले यांच्यासह सिटीलिंकचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ----------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Patil: एकनाथ शिंदेंकडून संजय पाटलांची पाठराखण, पण फडणवीसांनी आरसा दाखवला; शिवसेना नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांचा पाढाच वाचला

INDW vs BAN W Live: गचाळ क्षेत्ररक्षणामुळे भारतीय संघाची जगासमोर नाचक्की झाली; बांगलादेशने योग्य वेळी संधी साधली अन्...

Air India IndiGo Incident: अहमदाबाद विमानतळावरील अपघात टळला; दोन विमानं अचानक समोरासमोर; नेमकं काय घडलं?

INDA vs SLA Test: ऋतुराज गायकवाड, देवदत्तने संधी गमावली; साई सुदर्शनची सेंच्युरी, तर ध्रुव जुरेल, शेख राशीदची दमदार फिफ्टी

Pachod Rain : दीर्घ प्रतीक्षेनंतर पावसाची दमदार हजेरी; शेतशिवार गजबजले, बियाण्यांच्या दुकानांत वाढली गर्दी

SCROLL FOR NEXT