नाशिक

मॉन्सून टास्क फोर्स

CD
पावसाळी समस्यांसाठी ‘मॉन्सून टास्क फोर्स’ सज्ज २६ जूनपासून प्रभागनिहाय विशेष मोहिम; ६ स्वतंत्र पथके तैनात सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २५ : पावसाळ्यात नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये आणि स्थानिक पातळीवरील समस्या तातडीने सुटाव्यात यासाठी महापालिकेने प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या समन्वयातून विशेष ‘मॉन्सून टास्क फोर्स’ कार्यान्वित केला आहे. शहरातील सहा विभागांसाठी प्रत्येकी एक असे एकूण सहा पथक नियुक्त करण्यात आले असून २६ जूनपासून प्रभागनिहाय विशेष मोहीम सुरू होणार आहे. प्रत्येक पथक संबंधित नगरसेवकांच्या थेट समन्वयात प्रत्यक्ष काम करणार आहे. नालेसफाई, गटार साफसफाई, पाणीपुरवठ्यातील अडचणी, पाइपलाइन गळती, रस्त्यांवरील खड्डे, पाणी साचणारी ठिकाणे आणि धोकादायक झाडांच्या फांद्या यांसारख्या पावसाळी समस्यांवर तातडीने उपाययोजना केली जाणार आहे. नागरिकांनी आपल्या परिसरातील तक्रारी नगरसेवकांकडे मांडल्यास त्या तातडीने पथकाकडे पाठवून निपटारा केला जाईल. प्रत्येक पथकात महापालिका अधिकारी, कर्मचारी आणि आवश्यक मनुष्यबळासह सुमारे १५ सदस्य असणार आहेत. जेसीबी, टिप्पर, क्रेन आणि तांत्रिक साहाय्यही उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे कामांची गती वाढणार आहे. ही विशेष मोहीम २६ जूनपासून सुरू होणार असून प्रत्येक विभागात एका प्रभागासाठी सलग चार दिवस कामे केली जातील. एका प्रभागातील कामे पूर्ण झाल्यानंतर पथक पुढील प्रभागात जाईल. पंचवटी, नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, नाशिक रोड, नवीन नाशिक आणि सातपूर या सहाही विभागांसाठी प्रभागनिहाय वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. -------------------कोट------- फोटो घेणे पावसाळ्यात समस्या निर्माण झाल्यानंतर उपाय करण्यापेक्षा समस्या निर्माणच होऊ नयेत यासाठी परिसरातील अडचणी संबंधित नगरसेवकांकडे कळवाव्यात. - मनिषा खत्री, आयुक्त, महापालिका. -----------कोट फोटो घेणे महापालिका व नागरिकांच्या संयुक्त प्रयत्नांतून नाशिक शहर पावसाळा सुरक्षित, स्वच्छ आणि सुरळीत पार पडेल. - हिमगौरी आहेर-आडके, महापौर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT