धुळे : टुडे पान २ साठी..
--
फोटो क्रमांक : 22502
धुळे : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार यांच्याशी चर्चेवेळी त्यांचा सत्कार करताना जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीचे पदाधिकारी.
--
धुळे जिल्हा ‘निपुण’ करण्यासाठी प्रयत्न करा
--
सीईओ बाबासाहेब बेलदार : शिक्षक समन्वय समितीकडून सत्कारासह चर्चा
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २५ : धुळे जिल्हा सध्या ‘निपुण भारत प्रोग्राम’मध्ये मागे असून, जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना निपुण करण्यासाठी सर्व गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख आणि शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी विशेष प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार यांनी केले.
धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी बेलदार यांची भेट घेऊन सत्कार करण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करून निवेदन देण्यात आले. जिल्ह्यात विभागीय परीक्षेद्वारे समुपदेशनाने नवनियुक्त ३९ केंद्रप्रमुखांची नियुक्ती अत्यंत पारदर्शक पद्धतीने पार पाडल्याबद्दल समितीने मुख्य कार्यकारी अधिकारी बेलदार यांचे आभार मानले. निवेदनात टीईटी व सीटीईटी पात्र शिक्षकांना लवकर पदोन्नती देणे, पदवीधर विषय शिक्षकांना नागपूर न्यायालयाच्या निर्णयानुसार सरसकट वेतनश्रेणी लागू करणे, आणि २४ वर्षे सेवा पूर्ण झालेल्या प्राथमिक शिक्षकांना सरसकट निवड वेतनश्रेणी देणे या मागण्या मांडण्यात आल्या. ३० एप्रिलच्या बैठकीतील प्रलंबित विषय प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून लवकरच मार्गी लावू, असे आश्वासन सीईओ बेलदार यांनी दिले. त्यानंतर समिती पदाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकारी डॉ. मनीष पवार यांची भेट घेऊन शालेय सुटी परिपत्रक, शालेय वेळ कमी करणे आणि पदोन्नतीबाबत चर्चा केली. समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष योगेश धात्रक, सरचिटणीस चंद्रकांत सत्तेसा, कार्याध्यक्ष रवींद्र पाटील, विजय खैरनार, विश्वनाथ सोमवंशी, राजेंद्र भामरे, ज्ञानेश्वर पवार, भटू पाटील, अविनाश काकुळदे, विलास पाटील, ज्ञानेश्वर बाविस्कर, जगदीश पाटील आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.