नाशिक

अवतीभवती

CD
अवतीभवती- धुळे टुडे २ साठी... --- फोटो-NSK26H22486 धुळे : शारदा नगर येथे आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमप्रसंगी उपस्थित दिव्यांग बांधवांसह डॉ. सुशील महाजन, डॉ. निशा महाजन व इतर मान्यवर. दिव्यांगांसोबत योगदिन साजरा धुळे : योग विद्या धाम, धुळे संचलित शंकरराव चव्हाण स्वास्थ्य केंद्र तसेच भाजपचे प्रदेश सरचिटणीस डॉ. सुशील महाजन व नगरसेविका डॉ. निशा महाजन यांच्यातर्फे प्रभाग क्रमांक दोनमधील शारदा नगर येथील ‘शिवालय’ संपर्क कार्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन दिव्यांग बांधवांसमवेत साजरा करण्यात आला. योग शिक्षिका उर्मिला पाटील, योगशिक्षक संदीप कुलकर्णी व निमेश महाजन यांनी उपस्थितांना योगासने व प्राणायामाची प्रात्यक्षिके दाखविली. दैनंदिन जीवनातील योगाचे महत्त्व आणि निरोगी आरोग्यासाठी उपयुक्त आसनांविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला माजी महापौर प्रतिभा चौधरी, नंदू ठोंबरे, यशवंत येवलेकर, युवराज बोरसे, संजय सरक, कमलेश महानोर, निशा चौबे, मिरज देसले, राहुल गांधी, किशोर वाणी, संजय कांकरिया आणि योगेश कोठावदे उपस्थित होते. दिव्यांग बांधवांनीही कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. --- फोटो- NSK26H22488 धुळे : विद्याधन पीजीडीएमएलडी परीक्षेत प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या करण अहिरे याचा सत्कार करतांना मान्यवर. विद्याधन कॉलेजचा करण अहिरे प्रथम धुळे : शारदा शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वलवाडी येथील विद्याधन पीजीडीएमएलटी कॉलेजचा करण अहिरे विशेष प्राविण्यसह ८८.३३ टक्के गुण प्राप्त करत महाविद्यालयात प्रथम आला. नंदिनी पाटील (८७.००) हिने विशेष प्राविण्यासह द्वितीय क्रमांक प्राप्त केला. तसेच, मागासवर्गीय विद्यार्थ्यांमधून रमेश पराडके याने विशेष प्राविण्यासह प्रथम क्रमांक पटकाविला.उर्वरीत विद्यार्थीदेखील प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. सर्व विद्यार्थ्यांना विभागप्रमुख प्रा. दीपाली पाटील, प्रा. सुवर्णा पाटील, प्रा. डॉ. जागृती पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांनी नामवंत प्रयोगशाळांना भेटी देऊन प्रात्याक्षिक करुन घेतले. संस्थेतर्फे अध्यक्षा शारदा पाटील, प्राचार्य डॉ. के. बी. पाटील, संस्थेचे सचिव हर्शल पाटील, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. योगेश बोरसे, संचालिका प्रा. डॉ. जागृती पाटील, विभागप्रमुख प्रा. दीपाली पाटील, प्रा. सुर्वणा पाटील यानी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यशस्वी विद्यार्थी- विद्यार्थीनींचा महाविद्यालयात सत्कार करण्यात आला. प्रा. ललिता निकम, प्रा. मंजूषा पवार, प्रा. प्रतिक्षा पाटील, प्रा. सुजाता चव्हाण, प्रा. पूनम देसले, प्रा.दीपाली काकुळते, स्वप्नील पाटील, मोनाली वाघ, आकाश उफाडे, सोनल पाटील, पूनम पाटील, चुडामण ठाकरे उपस्थित होते. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs BANW: करो वा मरो सामन्यात टीम इंडियाची कसोटी; T20 WC मध्ये बांगलादेशविरुद्ध उतरले मैदानात

पत्रकारांना धमक्या देऊ नका; हिम्मत असेल तर राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जा, आदित्य ठाकरेंचे संजय पाटलांना खुले आव्हान

Virat Kohli: विराट कोहलीच्या नावाची जादू! लॉन्च होताच One8 चे 1.5 लाख शूज विकले; 24 तासांत कोट्यवधींची कमाई

LPG LNG Ships: मोठा दिलासा! 'होर्मुज'मधून 'एवढी' जहाजं भारताकडे रवाना, 26 जहाजं अजूनही आहेत रांगेत

Kamali Serial TRP: 'कमळी'चा नंबर पहिला! स्टार प्रवाहच्या 'ठरलं तर मग'ला टाकलं मागे; काय आहे नवी रँकिंग?

SCROLL FOR NEXT