नाशिक

दोन रुग्णालयांसाठी १९२ पदांना मंजुरी

CD
टूडे साठी --------------- दोन रुग्णालयांसाठी १९२ पदांना मंजुरी सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २५ : संदर्भसेवा रुग्णालय आणि १० खाटांच्या स्त्री रुग्णालयासाठी आवश्यक पदनिर्मितीस राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. आमदार देवयानी फरांदे यांच्या पाठपुराव्यानंतर २४ जूनला सार्वजनिक आरोग्य विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला. संदर्भ सेवा रुग्णालयात कर्करोग, न्युरोसर्जरी, हृदयरोग, प्लास्टिक सर्जरी, क्ष-किरण, शरीरविकृती, शुश्रूषा व इतर विभागांसाठी ९५ नवीन पदे मंजूर झाली आहेत. तर स्त्री रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक, स्त्रीरोग, बालरोग, भूलतज्ज्ञ, परिचारिका, तंत्रज्ञ व प्रशासकीय कर्मचाऱ्यांसह ९७ पदांना मंजुरी मिळाली आहे. या निर्णयामुळे कर्करोग, न्युरोसर्जरी, हृदयरोग, प्लास्टिक सर्जरी आणि अर्भक अतिदक्षता सेवा स्थानिक पातळीवरच उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे महिला, बालक आणि गंभीर आजारांच्या रुग्णांना उपचारासाठी मुंबई-पुण्यावर अवलंबून राहावे लागणार नाही. शासनाच्या मंजुरीबद्दल आमदार फरांदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर आणि प्रधान सचिव यांचे आभार मानले. दोन्ही रुग्णालये लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी पाठपुरावा सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. ------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Holiday: आज मोहरमनिमित्त बँका बंद की सुरू? पाहा RBI ची अपडेट, सलग 3 दिवस...

Bhiwandi Minor Assault Case : भिवंडीत संतापजनक घटना! ७ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, आरोपीने फ्लॅटमध्ये बोलावले अन्...

Shocking Video: अंत्यसंस्कार केले, तेरावाही झाला अन् खुनाचा गुन्हाही दाखल केला... पण त्याच व्यक्तीने अचानक घराचा दरवाजा ठोठावला!

Tukaram Mundhe: विधानसभेत मोठी घोषणा; FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली नाही, भेसळ माफियांना धक्का!

Nashik Tourism : नाशिकच्या 'या' प्रसिद्ध पर्यटनस्थळांवर रील बनवण्यास आणि सेल्फी घेण्यास बंदी! उल्लंघन केल्यास कारवाई; हरिहरगडावर दिवसाला 300 पर्यटकांनाच प्रवेश

SCROLL FOR NEXT