नाशिक

जिल्हा परिषदेच्या

CD
ॲंकर NSK26H22506 जळगाव : आरोग्‍य विभागाच्‍या बैठकीत बोलताना मुख्‍य कार्यकारी अधिकारी करिश्‍मा नायर. शेजारी डॉ. सचिन भायेकर, डॉ. रमेश धापते, डॉ. आकाश चौधरी आदी. -- संभाव्य साथीच्या आजारांबाबत सतर्क राहून काम करा (उपशीर्षक) सीईओ करिश्मा नायर यांचे आरोग्‍य यंत्रणेला निर्देश; आरोग्य विभागाची बैठक सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २५ : सध्या पावसाळा सुरू झाला असून वातावरणातील बदल तसेच त्यातून उद्भवणाऱ्या आरोग्यविषयक समस्या आणि संभाव्य साथीच्या आजारांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेने सतर्क राहून मिशन मोडवर काम करावे. तसेच एचपीव्ही लसीकरण व राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी दिले. जिल्हा परिषदेच्या छत्रपती शाहू महाराज सभागृहात गुरुवारी (ता. २५) आरोग्य विभागाची कार्यकारी सभा मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यात आढावा घेत त्यांनी सूचना केल्‍या. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रमेश धापते, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ आकाश चौधरी, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. विशाल पाटील तसेच सर्व तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. चौकट पुरेसा औषध साठा ठेवा पावसाळ्यात ग्रामीण भागात सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयांमध्ये आवश्यक औषधसाठा, सर्पदंशावरील प्रतिविष औषधे तसेच आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तर संभाव्य साथीरोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात आवश्यक औषधांचा साठा उपलब्ध करून घ्यावा, असेही त्यांनी सांगितले. ––––––––

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Dhabi Visa: भारतीय पर्यटकांसाठी खुशखबर! अबू धाबीचा UAE व्हिसा मोफत मिळणार, अटी काय अन् कुणाला फायदा होणार?

India Unemployment Rate: तरुणांसाठी नोकरीची चिंता कायम! देशातील बेरोजगारीची स्थिती ‘जैसे थे’; दर ५.५ टक्क्यांवर स्थिर

विद्यार्थ्यांनो, तुमच्या हातात बदलाची ताकद! गावाची समस्या जगासमोर मांडा; साम टीव्ही देतंय ‘Next Gen Reporter’चं व्यासपीठ

Pune Grand Tour : पुणे ग्रँड टूरसाठी ४१३ किमीचे नवीन रस्ते; ६२७ कोटींचा खर्च

Nutritious Diet : पोषण आहाराअभावी विद्यार्थ्यांची ताटे रिकामीच! कुठे तेल आहे तर तांदूळ नाही, हळद आहे तर जिरे-मोहरी नाही

SCROLL FOR NEXT